चंद्रपूर : भारतीय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित, भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर येथे संस्थेचा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सी. डी. तन्नीरवार, प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक सी.बी. टोंगे, पर्यवेक्षिका राऊत, पर्यवेक्षक विधाते आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक उपमुख्याध्यापक सी.बी. टोंगे यांनी केले. यावेळी त्यांनी शाळेच्या जुन्या आठवणी आणि सध्याची परिस्थिती यावर मत व्यक्त केले. शाळेविषयी मनोगत व्यक्त करतांना किशोर उईके यांनी गतकालीन प्रगतिविषयी प्रकाश टाकला.तर ढवस यांनी शाळेच्या उत्तरोत्तर प्रगती विषयी मत व्यक्त केले. शाळेतील विद्यार्थी जाफर शेख, सुरक्षा साव आणि आचल पंधरे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक सी. डी तन्नीरवार यांनी शाळेची प्रगती व प्रगतीसाठी मार्गदर्शन आणि सहकार्य करणारे पदाधिकारी मंडळाचे आभार मानले.
कार्यक्रमाला कार्यकारी मंडळाचे सदस्य चेतन चव्हाण, सर्जेकर तथा संस्थेचे सदस्य मोहन जेनेकर, हरिदास टोंगे तसेच शाळेतील सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. संचालन धोटे यांनी तर आभार राजूरकर यांनी मानले.