जनसेवा गोंडवाना पार्टीचा आढावा
चंद्रपूर : जनेसवा गोंडवाना पार्टीचा आढावा ऊर्जानगर, दुर्गापूर येथील बैठकीत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अवचितराव सयाम यांनी घेतला. यावेळी प्रा. धीरज शेडमाके, राजेंद्र रमतकार, ॲड. चेतन सयाम, बंडू मडावी, विनोद शेंडे, गिरीधर लांबट, हंसराज वनकर, शंकर मांदाळे, दत्तूजी मडावी, आरिफ खान, चांदेकर उपस्थित होते. यावेळी जि. प. व पं. स. निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन सयाम यांनी केले.
एस. पी. महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण सप्ताह
चंद्रपूर : सरदार पटेल महाविद्यालयातील गृहअर्थशास्त्र विभाग आणि आयएमए यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पोषण विषयक, इतर समस्या व उपाययोजना या विषयावर एक दिवसीय अभासी पद्धतीने वेबिनार पार पडले. प्रमुख वक्ते म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मंगशे गुलवाडे, उपप्राचार्य स्वप्नील माधमशेट्टीवार, संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. बी. किशोर, प्रा. संतोष शिंदे, डॉ. उषा खंडाळे उपस्थित होते.
प्राध्यापकाकडून ग्रंथालयाला पुस्तके भेट
चंद्रपूर : सरदार पटेल महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागप्रमुख तथा गोंडवाना विद्यापीठाच्या संगणकशास्त्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. बी. किशोर यांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी व संगणकशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वत:च्या संग्रहातील तब्बल ५३१ पुस्तके स्व. रामदेवी ओंकारनाथ शर्मा ग्रंथालयाला भेट दिली. यावेळी प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते.
संत सेना महाराज पुण्यतिथी
चंद्रपूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त संत नागाजी महाराज सभागृहात कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चिटणीस नाभिक महासंघाचे प्रभाकर फुलबांधे प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर क्षीरसागर, मोहन वनकर, प्रकाश आकनपल्लीवार आदी उपस्थित होते. यशस्वितेसाठी अरुण चौधरी, राजू बन्सोड, श्याम वनस्कर, भाऊराव येसेकर आदींनी प्रयत्न केले.
बंगाली कॅम्प येथे शिक्षकांचा सत्कार
चंद्रपूर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून रवींद्र विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सत्कार नगरसेवक अजय सरकार यांच्यातर्फे करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य बांगला भाषा समितीचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ पुणेचे अध्यक्ष महादेव मल्लिक यांचासुद्धा त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक शेखाराणी बारई, शंकर, सिद्दुसरे, सागर दास, अनिता सेन गुप्ता, गोल्डी परचाके आदी उपस्थित होते.