पळसगाव (पिपर्डा ) : महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता एप्रिल महिन्यापासून कोरोनाची साखळी तोडण्याकरिता महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन करून कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी कोविड चाचणी व लसीकरण करण्याकरिता आवाहन केले. गावागावात जाऊन आरोग्य टीम तपासणी करीत आहे.
बुधवारला ग्रामपंचायत पिपर्डा येथे आरोग्य पथकाद्वारे पिपर्डा येथील नागरिकांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. गेल्या काही दिवसांत रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी गावाची खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने १६ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालय पिपर्डा येथे कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन केले. यावेळी भगवान कावळे, माणिक भोंडे, किशोर नवघडे, सोमेश्वर निखाडे, प्रणिता पिसे, चेतन सोरदे, जी एस मानकर, प्रमोद बोरकर, प्रमोद मेश्राम आदी उपस्थित होते.