शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

शाळांच्या वेतनेत्तर अनुदानात दुजाभाव

By admin | Published: May 11, 2014 11:25 PM

राज्यातील खासगी, प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांना विकसनशिलतेच्या हेतूने दिल्या जाणारे परंतु बर्‍याच दिवसापासून बंद असलेले वेतनेत्तर अनुदान शासनाने नुकतेच पुन्हा सुरु केले आहे.

सास्ती : राज्यातील खासगी, प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांना विकसनशिलतेच्या हेतूने दिल्या जाणारे परंतु बर्‍याच दिवसापासून बंद असलेले वेतनेत्तर अनुदान शासनाने नुकतेच पुन्हा सुरु केले आहे. मात्र या अनुदानाच्या लाभापासून आदिवासी उपयोजना क्षेत्र व उपयोजना क्षेत्राबाहेरील काही शाळांना वगळल्यामुळे या क्षेत्रातील शाळांचा विकास खुंटला जाणार आहे. या शाळा चालविण्यास अडचणी येत असून येथील कार्यरत कर्मचारी व विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसत आहे. राज्यातील खाजगी प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांना शाळेच्या विकसनशिलतेच्या निर्देशंकानुसार ६, ९ व १२ टक्केपर्यंत वेतनेत्तर अनुदान देण्यात येत होते. मात्र २४ नोव्हेंबर २०११ च्या शासन निर्णयानुसार सदर वेतनेत्तर अनुदान सन २००४-०५ पासून बंद करण्यात आले होते. खासगी शाळा चालविण्यास कोणताही निधी उपलब्ध राहत नाही. त्यामुळे या वेतनेत्तर अनुदानाच्या निधीमधून शालेय उपयोगी साहित्य, किंवा स्टेशनरी खरेदी तसेच शाळेच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक खर्च यातून भागविला जात होता. त्यामुळे शाळांचा विकासही होत होता. परंतु सदर निधी शासनाने अचानक बंद केल्यामुळे शाळांचा दर्जा खालाविला जाऊन विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्याअभावी अडचणींचा सामना करावा लागत होता. काही ठिकाणी शाळा चालविणेसुद्धा कठीण होत होते. त्यामुळे शाळांना वेतनेत्तर अनुदान पुन्हा सुरु करण्याबाबत विविध संस्थांनी केलेली आग्रहाची मागणी लक्षात घेऊन शासनाने २० फेब्रुवारी २००८ अन्वये समिती गठीत करुन यावर चर्चा करण्यात आली. त्यात ३१ आॅक्टोबर २०१२ ला वेत्तनेत्तर अनुदान सुरु करण्याबाबत निर्णयही घेण्यात आला व १९ जानेवारी २०१३ च्या निर्णयानुसार १०० टक्के योजनेत्तर (नान प्लॅन) मध्ये वेतन घेणार्‍या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍याच्या वेतनानुसार पाच टक्के वेतनेत्तर अनुदान मंजूर करुन २९ जानेवारी २०१४ ला निधीही मंजूर केला गेला. परंतु यात घातलेल्या काही अटींमुळे मात्र आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व उपयोजना बाह्य क्षेत्रातील शाळांना वगळण्यात आले.त्यामुळे त्या शाळा या अनुदानापासून वंचित राहणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील १०० टक्के योजनेत्तर (नॉन प्लॅन) मधील एकूण २८८ शाळांपैकी आदिवासी उपयोजना क्षेत्र व उपयोजना बाह्य क्षेत्रातील (प्लॅन मधील) १० शाळांना शासनाने घातलेल्या अटीमुळे हा निधी दिला जाणार नाही. या दहा शाळा वेतनेत्तर अनुदानापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे या शाळांच्या विकासाला खिळ बसणार असून येथील कार्यरत कर्मचारी व विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक सुविधांपासून नेहमीच दूर रहावे लागणार आहे. आदिवासींच्या उच्चाटणासाठी शासन सदैव प्रयत्न करीत असूनही त्यांच्याच अशा काही अटीमुळे याच आदिवासी क्षेत्रातील शाळांना असा फटका बसत आहे. (वार्ताहर)