कोरपना तालुक्याच्या प्रत्येक गावाच्या शिवारात जाण्यासाठी पांदण रस्ते आहेत. या रस्त्यांची महसूल दप्तरी नोंद आहे. मात्र, देखभालीअभावी तालुक्यातील बऱ्याच पांदण रस्त्यांची दुरवस्था झाली. अशीच काहीशी अवस्था आवाळपूर येथील पांदण रस्त्याची झाली आहे.
आवाळपूर परिसरातील कन्नाके यांच्या शेतापासून ते बोधाने यांच्या शेतापर्यंत ८५० मीटर, जनाबाई वानखेडे यांच्या शेतापासून ते उद्धव देवाळकर यांच्या शेतीपर्यंत ६०० मीटर, सातपुते यांच्या शेतापासून ते कवडू कोंडेकर यांच्या शेतापर्यंत ८०० मीटर, बंडू बदखल यांच्या शेतापासून ते रमेश दिवे यांच्या शेतापर्यंत ५०० मीटर पांदण रस्त्यांचे काम होणे अत्यंत गरजेचे आहे. ऐन शेतीचा हंगामात पांदण रस्ता नसल्याने शेतीची कामे करणेसुद्धा कठीण झाली आहेत. शेतीची कामे कशी करावीत, असा प्रश्न पडला आहे. बैलगाडी घेऊन जाणे तर दूरच शेतमजुरांना घेऊनही जाण्यास रस्ता नसल्याने कसरत करावी लागत आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा तसेच पांदण रस्ता गाव नकाशा दाखवून रस्ता ताबडतोब करून देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
ग्रामपंचायत प्रशासन सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता प्रशासनाने लक्ष देऊन पांदण रस्ता प्रश्न मार्गी लावला.
- बाळकृष्ण काकडे, उपसरपंच आवाळपूर.
200921\img-20210919-wa0033__01.jpg
आवाळपूर शेत शिवारातील पांदण रस्त्याची अवस्था.