चंद्रपूर : ९ जूनपासून सुरू झालेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत २८ व २९ जून रोजी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असून ही संधी आहे. मतदार यादीत अवश्य नाव नोंदवा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.विधानसभा मतदार संघाच्या छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रम जिल्हाभरात राबविण्यातत येत असून २८ जून व २९ जून या दिवशी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी जिल्हाभरात विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.९ मार्चला मतदार नोंदणीची विशेष मोहिम जिल्ह्यात राबविण्यात आली. या दरम्यान प्राप्त झालेल्या नवीन अर्जाची छाननी केली असता काही मतदारांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यांच्या नावाचा अंतर्भाव यादीत केला गेला नसून मतदारांनी यादीत नाव असल्याचे खात्री करुन घ्यावी व यादीत नाव नसल्यास कागदपत्राचीी पुन्हा पूर्तता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.यादीत नाव नोंदविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेसाठी मतदार सहाय्यता केंद्र प्रत्येक तालुक्यात सुरू केले असून या केंद्रावर सुद्धा नाव नोंदणीचे अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. यासाठी नायब तहसीलदारांची नेमणूक करण्यात आली असून त्यांचा दूरध्वनी क्रमांक तहसील कार्यालयात उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या विधानसभा मतदार संघ निहाय नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.विशेष मोहिमेच्या दिवशी म्हणजे २८ जून २९ जून या सुट्टीच्या दिवशी प्रत्येक मतदार केंद्रावर केंद्रस्तीय अधिकारी उपस्थित राहून मतदार यादीत नाव नोंदणी संबंधित अर्ज स्विकारणार आहेत. मान्यता प्राप्त राजकीय पक्षांना मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता नेमणूक करण्यास निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. विशेष मोहिमेच्या दिवशी संबंधित मतदान केंद्रावर राजकीयय पक्षाने नियुक्त केलेले मतदान एजंट हे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या समवेत दावे व हरकती स्विकारण्यासंबंधी हजर राहू शकतील.९ जून रोजी प्रारुप मतदार यादी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या याद्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे ूँंल्लंि.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहेत. मतदारानी आपले नाव यादीत असल्याचे खात्री करुन घ्यावे व नसल्यास अर्ज नमूना ६ भरुन यादीत नाव समाविष्ट करावे. (प्रतिनिधी)
मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन
By admin | Published: June 28, 2014 2:30 AM