माना समाजाची व्यथा : उच्च शिक्षण, नोकरीपासून समाजबांधव वंचितचंद्रपूर: वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी शिक्षण, त्याचबरोबर शासकीय नोकरी आणि अन्य शासकीय गोष्टींसाठी जातवैधता प्रमाणपत्रांची गरज आहे. मात्र, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या कार्यालयात माना जमातीचे जात प्रमाणपत्रांचे शेकडो प्रस्ताव धूळखात ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांना जातवैधता प्रमाणपत्रासाठी धावपड सुरु आहे.चंद्रपूर येथील साक्षी रामराव नन्नावरे हिची वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण करण्याची इच्छा होती. यासाठी तिला जातवैधता प्रमाणपत्राची गरज होती. तिने प्रस्ताव तयार करुन जातवैधता प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयात जमा केली. एक- दोन महिन्यांत हे काम होईल, असे प्रारंभी तिला सांगण्यात आले होते. मात्र, आज कित्येक महिने लोटून गेले तरी तिचा जातीवैधता, प्रमाणपत्राचा प्रस्ताव पेन्डिंग आहे. प्रास्ताव पेंडिंगचे कारण विचारल्यानंतर तिला वेगवेगळी कारणे सांगण्यात आली. अन्य जमातीच्या लोकांना कोणतेही कारण न सांगता कमी दिवसांत जातवैधता प्रमाणपत्र दिले जात आहे. मात्र, माना जमातीची प्रमाणपत्र अडवून ठेवली जात आहे.माना जमातीच्या अर्जदारांनी वडिलांचे, भावांचे जातवैधता प्रमाणपत्र जोडले. तरीही त्यांचे प्रस्ताव पेन्डिंग ठेवण्यात आले आहेत. साक्षी नन्नावरे हिनेही अन्य कागदपत्रे जातवैधता प्रमाणपत्रासाठी जोडली. तिचा प्रस्ताव धूळखात पडून आहे. प्रमाणपत्र मिळत नसल्याने साक्षीही सतत चिंतेत आहे. व कागदपत्रासाठी धावपड करीत आहे. जातवैधता प्रमाणपत्र मिळाले नाही तर प्रवेशही मिळणार नाही. या प्रश्नांनी तिच्या मनात वेगवेगळे विचार येत असल्याचे तिचे वडील रामराव नन्नावरे यांनी सांगितले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी लक्ष घालून प्रमाणपत्र द्यावे.(नगर प्रतिनिधी)
जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्जदारांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2017 12:34 AM