शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

या ३६ केंद्रातून स्वीकारले जाणार लाडक्या बहिणींचे अर्ज

By साईनाथ कुचनकार | Published: July 16, 2024 4:47 PM

सहायता केंद्रात वाढ : सुटीच्या दिवशीही सुरू राहणार केंद्र

साईनाथ कुचनकार

चंद्रपूर : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’च्या अंमलबजावणीसाठी चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे यापूर्वी ५ सहायता केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. मात्र, आता होणारी गर्दी बघता आणखी ३१ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आता एकूण ३६ केंद्रांवर नागरिकांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.

महापालिका मुख्य कार्यालय, तीन झोन कार्यालये, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय (बीपीएल ऑफीस) अशा ५ केंद्रांवर नागरिकांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची सुविधा मनपातर्फे देण्यात आली होती. आता या केंद्रांवर टेबल वाढविण्याबरोबरच ७ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, १६ नागरी आरोग्य वर्धिनी अशी एकूण ३६ सहायता केंद्रे मनपातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही सर्व सहायता केंद्रे सुटीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत.

या केंद्रांमध्ये प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले असून, मनपातर्फे दोनदा त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. अर्ज प्राप्त झाल्यावर त्यांची छाननी करून तात्पुरती यादी बनविण्यात येत आहे. केंद्रात अर्ज हे दोन्ही ऑफलाइन व ऑनलाइन माध्यमातून स्वीकारण्यात येत आहेत. आशा वर्कर व समूह संसाधन व्यक्ती यांनाही प्रशिक्षण देण्यात आले असल्याने अर्ज भरण्यास त्यांचीही मदत अर्जदार महिलांना घेता येणार आहे.येथे करा संपर्क

अर्ज भरताना काही समस्या असल्यास संपर्क क्रमांक ७७७००१५६६३ तसेच महिला हेल्प लाईन क्र. १८१ वर संपर्क करा.कोट

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी शहरात ३६ केेंद्रांतून अर्ज भरण्याची सुविधा करण्यात आली आहे. या सर्व केंद्रात नि:शुल्क अर्ज भरता येणार आहेत. नागरिकांनी जवळच्या मदत केंद्राशी संपर्क साधावा व योजनेचा लाभ घ्यावा."-विपीन पालिवाल, आयुक्त महापालिका 

...या केंद्रांवर भरा अर्जमनपा मुख्य कार्यालय, संजय गांधी मार्केट झोन १ कार्यालय, सात मजली इमारत झोन कार्यालय, बंगाली कॅम्प झोन कार्यालय, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे - शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, रामनगर, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, दे. गो. तुकूम, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदिरानगर, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, गोपालपुरी, बालाजी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, बगडखिडकी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नेताजी चौक, बाबुपेठ, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, सुपर मार्केट, भिवापूर, आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्रे - प्रज्ञा चौक, स्वावलंबीनगर, नगिनाबाग, वसंतनगर, दे. गो. तुकूम, विवेकानंदननगर, वडगाव, रवींद्रनाथ टागोर प्राथमिक शाळा, विठ्ठल मंदिर वाॅर्ड, रयतवारी कॉलरी, रहमतनगर, के. जी. एन. मस्जिद, ताडबन, अंचलेश्वर वाॅर्ड, झाकीर हुसेन प्रायमरी शाळा, दादमहाल वाॅर्ड, आपला दवाखाना, घुटकाळा वाॅर्ड, लालपेठ कॉलरी, गौरी तलाव बाबुपेठ, हिंग्लाज भवानी वाॅर्ड, महाकाली कॉलरी, पंचशील चौक, इंदिरानगर, पंचशील चौक, शास्त्रकार ले आऊट, रयतवारी कॉलनी.

 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाchandrapur-acचंद्रपूर