सरपंच संघटनेचे पालकमंत्र्यांना निवेदन : दखल घेण्याची मागणीवरोरा : वरोरा तालुका सरपंच संघटनेतर्फे तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व ग्रामपंचायत संबंधित विविध मागण्यांचे निवेदन अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले.प्रधानमंत्री पीक विमा योजना वरोरा तालुक्यातील कापूस तथा सोयाबिन पिकांकरीता लागू करावी, वरोरा तालुक्यातील दिवसाचे भारनियमन बंद करण्यात यावे, जेणे करून शेतकऱ्यांच्या सिंचनाकरीता विद्युत उपलब्ध होईल, ग्राम पंचायत अंतर्गत तीन लाखांवरुन १० लाखांपर्यंत ई- टेंडर लागू करण्यात यावे, ग्रामीण स्वच्छता अभियानांतर्गत तालुका हागणदारीमुक्त करणे, गौण खनिज उत्खननाचे अधिकार ग्रामपंचायतीला देण्यात यावे, विधान परिषदेमध्ये सरपंच प्रतिनिधी नेमावे, सरपंचला मानधन दहा हजार रुपये व उपसरपंच पाच हजार व सदस्य बैठक भत्ता ५०० रुपये करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन वरोरा तालुका सरपंच संघटनातर्फे अर्थ, नियोजन व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना देण्यात आले.यावेळी वरोरा तालुक्यातील सरपंच संघटनेचे अध्यक्ष मारोतराव झाडे, सचिव सुशीला तेलमोरे, सल्लागार मिलींद भोयर, डॉ. निकुरे, अजय पा. ठाकरे, सुषमा सोयाम, संजय मोडक, संजय आसेकर, नरेंद्र आडकिने, सुरेश कुत्तरमारे, मनिषा कांबळे, ममता चौधरी, ज्योती पेटकर, कमला तलसे, मायाताई बोढे, गिता खापने, लक्ष्मी पुसनाके, विठाबाई झाडे, सुमन माकोडे, रविंद्र कांबळे, चंदाताई निकुरे व संघटनेचे आदी पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
तीन लाखांवरील कामांसाठी ई-टेंडरिंग लागू करा
By admin | Published: November 13, 2016 12:41 AM