लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सततची नापिकी व हवालदार शेतकरी आत्महत्यामुळे शेतकºयांचे संसार उघड्यावर पडलेले आहे. या सर्व बाबी लक्षात घेत शिवसेनेतर्फे सातबारा कोरा ही मागणी घेवून सर्व राज्यभर आंदोलने केली. राज्य सरकारने शेवटी एक लाख ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज माफीची घोषणा केली. त्यासोबतच दहा हजार रुपये कर्ज तातडीने शेतकºयांना उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.दरम्यान शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेचे अर्ज आॅनलाईन भरायचे आहे. मात्र अनेकांना अडचण जात आहे. त्यामुळे अर्ज आॅफलाईन घेण्याची मागणी शिवसेनेने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.शासनाने कर्जमाफी केल्यानंतसर जिल्ह्यातील फक्त २४८ शेतकºयांना दहा हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. तर कर्जमाफीसाठी अनेक शेतकºयांनी अर्ज दाखल केले. मात्र जाचक अटीमुळे फक्त २४८ शेतकºयांनाच याचा लाभ मिळाला असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेचे अर्ज आॅफलाईन घेण्याची मागणी शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे.यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश भिवगडे, नगराध्यक्ष अनिल धनोरक, नगरसेवक सुरेश पचारे, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेचे अर्ज आॅफलाईन घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 11:47 PM
सततची नापिकी व हवालदार शेतकरी आत्महत्यामुळे शेतकºयांचे संसार उघड्यावर पडलेले आहे. या सर्व बाबी लक्षात घेत शिवसेनेतर्फे सातबारा कोरा ही मागणी घेवून सर्व राज्यभर आंदोलने केली.
ठळक मुद्देशिवसेनेची मागणी : जिल्हाधिकाºयांना निवेदन