शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

निविदा न काढताच अभियंत्याची नियुक्ती

By admin | Published: April 24, 2017 1:03 AM

नगरपरिषदेत योग्य प्रकारे निविदा प्रक्रिया न राबविता स्थापत्य अभियंता सल्लागाराची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप ...

विलास टिपले यांचा आरोप : वरोरा नगरपरिषदेतील प्रकार, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारवरोरा : नगरपरिषदेत योग्य प्रकारे निविदा प्रक्रिया न राबविता स्थापत्य अभियंता सल्लागाराची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष विलास टिपले यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.वरोरा नगरपरिषदेमध्ये २२ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभा झाली. या सभेत पालिकेच्या बांधकाम विभागातील स्थापत्य अभियंता सल्लागारपदावर बी. जी. कन्सल्टन्सीची नियुक्ती करण्याचा ठराव पारित झाला. ही नियुक्ती करण्यासाठी कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया न राबविता अर्जदाराच्या अर्जावरच पालिकेच्या सभागृहाने निर्णय घेतला, असा आरोप माजी नगराध्यक्ष टिपले यांनी तक्रारीत केला आहे.नगरपरिषद निधीअंतर्गत आणि वेगवेगळ्या शासकीय योजनेअंतर्गत होणाऱ्या विकास कामांचे नकाशे, अंदाजपत्रक, तयार करणे व त्यास मंजुरी प्राप्त करणे, स्ट्रक्चर डिझाईन करणे, व त्यास मंजुरी देणे, कामावर देखरेख ठेवणे, कंत्राटदाराने केलेल्या कामाची मोजणी पुस्तकात नोंद घेणे, त्यांचे देयक तयार करणे आदी कामे बी. जी. कन्सल्टन्सीला विनानिविदा देण्यात आली. हे चुकीचे आणि नियमबाह्य असल्याने त्याची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणीही टिपले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे . या सर्वसाधारण सभेत मालवीय वॉर्डामधील खुल्या जागेचे प्रवेशद्वार, प्रभाग क्र. १ मधील सीसी ड्रेनचे व कांक्रीट नाला बांधकाम, प्रभाग ३ मधील पशुवैधकीय दवाखान्यापर्यंतचे सीसी ड्रेनचे बांधकामासंदर्भात निविदा दाखल करणाऱ्यांमध्ये चंद्रपूरच्या श्री. साई राम इंटरप्राईजेसची निविदा सर्वात कमी दराची होती. परंतु या कंपनीने काम करण्यास लेखी नकार दिल्यामुळे ही कामे दुसऱ्या क्रमांकाच्या जास्त दर असलेल्या कंत्राटदाराला तडजोड करून देण्यात आली. या भूमिकेवर माजी नगराध्यक्ष टिपले यांनी संशय व्यक्त केला आहे. तसेच हा प्रकार चुकीचा असून फेरनिविदा काढून काम घ्यायला हवे होते, असेही त्यांनी म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी )