चंद्रपूर : सन २०१५-१६ या वर्षासाठी चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना प्रस्तावित केलेल्या १३ भात व भरडधान्य खरेदी केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकारी हे संबंधित भात खरेदी करण्यात नोड एजन्सी महाराष्ट्र स्टेट को-आॅप मार्केटिंग अधिकारी फेडरेशनचे प्रतिनिधी म्हणून संपूर्ण प्रक्रिया पार पाडतील आणि ३१ आॅक्टोबरच्या शासन निर्णयातील सर्व अटी व शर्तीचे ते तंतोतंत पालन करतील.मंजूर करण्यात आलेल्या केंद्राचे नाव, तालुका व केंद्राचे ठिकाण पुढील प्रमाणे आहेत. मूल तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. मूल, सिंदेवाही तालुक्यातील सहकारी. खरेदी विक्री संस्था मर्या. सिंदेवाही व विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. नवरगाव.सावली तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. सावली, विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.व्याहाड (खुर्द), ब्रह्मपुरी तालुक्यातील सहकारी खरेदी विक्री संस्था मर्या. ब्रह्मपुरी, सहकारी खरेदी विक्री संस्था मर्या. खेड, कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रह्मपुरी, चंद्रपूर जिल्हा कृषी औद्योगिक संघ मर्या. चंद्रपूर, ब्रह्मपुरी, चंद्रपूर जिल्हा कृषी औ.संघ मर्या. चंद्रपूर बरडकिन्ही व गणेश सहकारी भात गिरणी मेंडकी, नागभीड तालुक्यातील सह.खरेदी विक्री संस्था मर्या. नागभीड व गुरुदेव सहकारी राईस मिल कोर्धा या केंद्राचे ठिकाणी भात व भरडधान्य खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी एका पत्रकान्वये दिली आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील १३ भात व भरडधान्य खरेदी केंद्रांना मंजुरी
By admin | Published: November 08, 2015 1:21 AM