संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले. मात्र, या प्रकरणात अनेक त्रुट्या असल्यामुळे त्रुट्यांची पूर्तता करून, विशेष सभेमध्ये त्यावर निर्णय घेण्याबाबत ठरविण्यात आले होते. एक महिन्यानंतर सभेचे आयोजन समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. सभेत इंदिरा गांधी विधवा योजना व संजय गांधी निराधार योजनेचे ४८, श्रावणबाळ योजनेचे १०२, वृद्धापकाळ योजनेच्या ७१ प्रकरणांची छाननी व तपासणी करण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार यांनी सदर प्रकरणाला मंजुरी दिली. यावेळी नायब तहसीलदार ठाकरे, समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, सदर नितीन येरोजवार, गंगाधर कुनघाडकर, दशरथ वाकुडकर, संजय गेडाम, सोनल मडावी, सुनील शेंडे आदी उपस्थित होते.
निराधार योजनेच्या २२१ प्रकरणांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:31 AM