कोरपना : तालुक्यातील नारंडा ग्रामपंचायत अंतर्गत येणारे विविध विकासकामे मंजूर करण्यात यावे, याकरिता जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी निवेदन दिले आहे.
नारंडा येथे स्मशानभूमी शेडला संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे, सामाजिक सभागृहासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे, सामाजिक सभागृहाच्या बाजूला किचन शेडचे बांधकाम करणे इत्यादी कामांची मागणी जिल्हा निधी सन २०२०-२१ अंतर्गत करण्यात आलेली आहे. सदर विकासकामे मंजूर झाल्यास गावातील नागरिकांना विकासात्मक सोयी सुविधा निर्माण होण्यास मदत होईल.
आपण सदर विकासकामे लवकरात लवकर मंजूर करू असे आश्वासन यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष गुरनुले यांनी यावेळी दिले.