वरोरा परिसरात ‘ब्रेक द चेन’ या शासकीय निर्बंधाचे अवलंबन करूनसुद्धा मागील तीन दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सर्व व्यापारी व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याशी प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी चर्चा केली. यामध्ये सर्व छोटी मोठी जीवनावश्यक वस्तू दुकाने, भाजीपाला केंद्र, भाजीपाला विक्रीची सर्व दुकाने शंभर टक्के बंद ठेवल्यास ब्रेक द चेननुसार मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूची साखळी तुटण्यास मदत होईल. त्यामुळे १३ एप्रिल ते १८ एप्रिलपर्यंत शहरातील सर्व दुकाने, आस्थापना बंद ठेवल्या जातील. सहा दिवसात जनतेने घराबाहेर पडू नये, १२ एप्रिलपासून सर्व्हे करण्याकरिता येणाऱ्या पथकास सहकार्य करावे, कोणतीही लक्षणे असल्यास तात्काळ प्रशासनास कळवून त्याची तपासणी करून घ्यावी, आवश्यक असल्यास विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. वरोरा शहरात एक कोविड सेंटर सुरू आहे. त्याचबरोबर एक कोविड सेंटर सिद्धिविनायक मंगल कार्यालय खांजी वॉर्ड येथे अधिग्रहित करण्याची तजवीज प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे ज्यांना होम आयसोलेशन शक्य नाही, त्यांना कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली.
वरोरात १३ एप्रिल १८ एप्रिल जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 4:26 AM