शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
4
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
5
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
6
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
7
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
8
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
9
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
10
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
11
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
12
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
13
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
14
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
15
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
16
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
17
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
18
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
19
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
20
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला

कोरोनाग्रस्ताच्या अंत्यसंस्कारासाठी आप्तेष्ट व ग्रामस्थांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:30 AM

अखेर रात्री ५० किमी अंतरावरून ‘ते’ आले मदतीसाठी अनवर खान पाटण : जिवती तालुक्यातील अतिशय दुर्गम गाव, एका झोपडीवजा ...

अखेर रात्री ५० किमी अंतरावरून ‘ते’ आले मदतीसाठी

अनवर खान

पाटण : जिवती तालुक्यातील अतिशय दुर्गम गाव, एका झोपडीवजा घरातच कोरोनाने कुटुंबप्रमुखाचा मृत्यू होतो, घरात मृतकाची पत्नी व मुलगाच. कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे भावंड, गावकरी अंत्यसंस्काराला यायला तयार नाहीत, रात्रीचे ११ वाजून गेलेले, याची माहिती पं.स. सभापती महेश देवकते यांना मिळाली. पीपीई किट व इतर साहित्य घेऊन लगेच ते ५० किमीचा प्रवास करून ते त्या गावी पोहोचले. काही युवकांना सोबत घेऊन लाकडे गोळा केली व रात्री १२ वाजतानंतर मृतकावर अंत्यसंस्कार केले.

जिवती तालुक्यातील वणी (बु.) येथे घरातच एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. घरी पत्नी आणि मुलगा हजर. कोरोनाच्या भीतीने गावातील लोक त्या घराकडे फिरकेतना. सख्खी भावंडेही यायला तयार नाहीत. आता मृतकावर अंत्यसंस्कार कसे करायचे, असा प्रश्न मृतकाच्या कुटुंबीयांसमोर होता. या परिस्थितीची माहिती जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते यांना मिळाली. त्यांनी त्यांचे सहकारी मित्र प्रमोद चव्हाण यास सोबत घेऊन पीपीई किट घेऊन गडचांदूरवरून ५० कि.मी.अंतरावरील वणी (बु.) येथील मृतकाचे घर गाठले. मृतदेह एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला पत्नी व मुलगा हंबरडा फोडून रडत होते. रात्रीचे ११ वाजले होते. अख्खे गाव घराचे दार लावून गाढ झोपेत होते. सरण ठेवण्यासाठी लाकडेही गोळा केली नव्हती. कोरोनाग्रस्ताचा मृतदेह ठेवायचा किती वेळ हाही प्रश्न होता. महेश देवकते यांनी गावातील युवक कैलास कुंडगीर, प्रेमसिंग राठोड, आनंद शेलोकर, वशिष्ट गिरी, राम देवकते, हनुमंत कुंडगीर, गोरख कुंडगीर, व्यंकटी कुंडगीर, प्रमोद घोटमुकले, मारोती कुंडगीर यांना सोबत घेतले. गावातून ट्रॅक्टर घेऊन रात्री १२ वाजेपर्यंत लाकडे गोळा केली. ती स्मशानभूमीवर रचून ट्रॅक्टर मृतकाच्या घरी आणले. गावातील तीन युवकांना व मृतकाच्या मुलाला पीपीई किट घालण्यास लावून मृतदेह ट्रॅक्टरमध्ये ठेवला. त्यानंतर त्यांच्या धर्मातील पद्धतीनुसार अंत्यविधी पार पाडून माणुसकी जपली.