आंदोलनाचा इशारा : विकासात्मक कामांना सुरुवात करावीलोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : विंजासन बुद्ध लेणी अखिल भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्ध यांच्या पदस्पर्शाने ही बुद्ध लेणी पावन झाली. तेथे देश विदेशातील पर्यटक व बुद्ध अनुयायी येतात. परंतु ही बुद्ध लेणी विकासापासून कित्येक वर्षापासून वंचित आहे. या लेणीचे संगोपन, जतन व विकासाकडे पुरातत्व विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन भद्रावती येथील विंजासन बुद्ध लेणी ट्रस्टने पत्रकार परिषदेत केले.विंजासन बुद्ध लेणीचे संगोपन व जतन करण्याची जबाबदारी शासनाने पुरातत्व विभागाकडे सोपविली आहे. परंतु पुरातत्व विभागाने जाणीवपूर्वक बुद्धलेणीच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केला.पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे बुद्धलेणीची अवस्था जीर्ण होण्याच्या मार्गावर आहे. लेणीच्या आत पाणी झिरपत आहे. त्यामुळे येथील दगडांची झीज होत आहे. लेणीच्या दर्शनी भागाचे नुकसान होत आहे.याकडे पुरातत्व विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा बुद्ध लेणी ट्रस्टच्या वतीने लेणीच्या संगोपन व जतन करण्याची कामे करण्यात येतील, असेही ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या समस्या संपूर्ण बौद्ध बांधवांच्या भावनेशी निगडीत असल्याने पुरातत्व विभागातर्फे त्वरित कामाला सुरुवात व्हावी अन्यथा बौद्ध बांधव तीव्र आंदोलन करतील, अशा इशाराही ट्रस्टतर्फे देण्यात आला.पत्रकार परिषदेत ट्रस्टचे अध्यक्ष सुशील देवगडे, सल्लागार राजू देवगडे, कुशल मेश्राम, हरीश दुर्योधन, सचिव पवन गौरकार, सूरज गावंडे, संदीप ढेंगळे, रमाकांत मेश्राम, मनोज भोडक, सुधाकर शंभरकर, मिलिंद शेंडे, राजू गावंडे, इंद्रपाल पाझारे, रजनीकुंदा रायपूरे, संध्या पेटकर, लता देवगडे, लता टिपले, लिला जांभुळे, वैशाली चिमूरकर, दर्शना पाटील, निळा थुलकर, गीता वाळके आदी उपस्थित होते.
पुरातत्त्व विभागाने भद्रावती विंजासन बुद्धलेणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे
By admin | Published: May 08, 2017 12:37 AM