प्रवासादरम्यान मास्क लावला नाही तर दंडात्मक कारवाई
चंद्रपूर : 'ब्रेक द चेन'अंतर्गत निर्बंध शिथिल करण्यात आल्याने काही प्रमाणात विशेष रेल्वे धावत आहेत. त्याला प्रवाशांकडून प्रतिसादही मिळत आहे. परंतु काही राज्यात प्रवाशांना कोरोना अहवाल बंधनकारक केल्याने प्रवाशांना स्वतःजवळ कोरोना अहवाल व लसीकरण प्रमाणपत्र बाळगणे गरजेचे झाले आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन करण्यात आले. पहिल्यांदाच सर्व रेल्वे सेवा बंद करण्यात आली. सुमारे पाच ते सहा महिन्यांनंतर विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आली. दरम्यान, प्रवाशाची संख्या घटली. आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढू लागली आहे. त्यातच डेल्टा प्लसचा धोका आहे. त्यामुळे परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच रेल्वेस्थानकांवरसुद्धा शिबिरे लावण्यात येत आहेत. यावेळी सर्वांची तपासणी करण्यात येते. रेल्वेमध्ये विनामास्क आढळून आल्यास प्रशासनाकडून दंड आकारण्यात येतो. त्यामुळे प्रवास करताना कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
बाॅस्क
कोरोना चाचणी, लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक
एखाद्या प्रवाशाला बाहेरच्या राज्यात जायचे असेल तर त्याला कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. रेल्वेने ही चाचणी बंधनकारक केली नसली तरी ज्या राज्यात जाणार आहात त्या राज्यात मात्र कोरोना चाचणी विचारली जाते. गोवा, कर्नाटक आदी राज्यांत तर लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र व चाचणी अनिवार्य केली आहे.
बॉक्स
सध्या सुरू असलेल्या रेल्वेगाड्या
नवजीवन एक्स्प्रेस
तामिळनाडू एक्स्प्रेस,
जीटी एक्स्प्रेस,
हमसफर एक्स्प्रेस, सिकंदराबाद एक्स्प्रेस,
दक्षिण रेल्वे,
नवजीवन एक्स्प्रेस,
तामिळनाडू एक्स्प्रेस,
तेलंगणा एक्स्प्रेस
बॉक्स
या रेल्वे कधी सुरू होणार?
काजीपेठ-पुणे एक्स्प्रेस
आनंदवन एक्स्प्रेस
ताडोबा एक्स्प्रेस
बल्लारपूर-सेवाग्राम
बल्लारपूर-गोंदिया पसेंजर
कोट
सध्या बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना पूर्वकाळजी म्हणून कोविडची तपासणी केलेले प्रमाणपत्र जवळ ठेवावे. ते स्थानकात प्रवेश करताना दाखवावे लागते.
-जयकिरणसिंग बजगोती
डीआरयूसीसी सदस्य, मध्य रेल्वे, बल्लारशाह
बॉक्स
पॅसेंजर कधी सुरू होणार?
बल्लारपूर जंक्शनवरून गोंदिया, वर्धा, नागपूर-भुसावळ, कोरबा पॅसेंजर धावतात. याला मोठ्या प्रमाणात प्रवासी मिळत होते. मात्र मागील लॉकडाउनपासून पॅसेंजर बंद करण्यात आल्या. तेव्हापासून आद्यपही त्या सुरू झाल्या नाही. विशेष रेल्वे सुरू करण्यात मग पॅसेंजर सुरू करण्यास कोणत्या अडचणी आहेत, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.
बॉक्स
गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये गर्दी
गोरखपूर, सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. इतर एक्स्प्रेसमध्ये अल्प प्रमाणात प्रवासी दिसून येत आहे.