शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कन्हाळगाव झरण क्षेत्रात रेती, लाकूड तस्करांना अटक

By admin | Published: January 23, 2017 12:35 AM

मध्य चांदा वनविकास महामंडळ विभाग बल्लारशाह अंतर्गत कन्हाळगाव वनक्षेत्रात एका आठवड्यात तीन मोठ्या कारवाई करुन जप्तीची व आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.

तीन घटना : वनविकास महामंडळाची मोठी कारवाईकोठारी : मध्य चांदा वनविकास महामंडळ विभाग बल्लारशाह अंतर्गत कन्हाळगाव वनक्षेत्रात एका आठवड्यात तीन मोठ्या कारवाई करुन जप्तीची व आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. सततच्या कारवाईमुळे शिकाऱ्यात, अवैध लाकूड तस्करांत व रेती तस्करांत दहशत निर्माण झाली आहे. १७ जानेवारीला वनकर्मचाऱ्यांना सोबत घेवून विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल वाघ गस्त करीत असताना रात्री १२ च्या सुमारास लाठी-वेजगाव गावाच्या मध्यंतरी अवैधरित्या हायवा ट्रकमध्ये रेतीची वाहतूक करताना पकडण्यात आले. त्यात चार ब्रासची वाहतूक परवाना होता. मात्र प्रत्यक्ष दहा ब्रास रेती भरलेली होती. तपासणी अंती ट्रक जप्ती करुन तोहोगाव कार्यालयात जमा करण्यात आले. ट्रक क्र. एमएच ३४ एडी ५१५१ जप्त करुन त्यांच्याकडून लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. २१ जानेवारीच्या रात्री चिवंडा-सोमनपल्ली जंगलात अवैद्य वृक्षतोडीसाठी सात बैलबंड्यासह गेल्याची माहिती वनाधिकारी प्रफुल्ल निकोडे यांना मिळताच वनपाल संभाजी कोंडेवाड, विपूल आत्राम, वनरक्षक गव्हारे, तिरांगे, सिंगम, देवतळे, मलांडे यांचेसह आठ- दहा वनमजुरांना सोबत घेवून जंगलात प्रवेश केला. जंगलात रात्रभर जागून बैलबंड्यात सागवान फाटे ३०० नग व सहा बिट जप्त करण्यात आले. तस्करांना कारवाईची माहिती आधीच मिळाल्याने बंड्या जंगलातील झुडूपात लपवून पळून गेले.२२ जानेवारीला कुडेसावली शेत शिवारात इलेक्ट्रीक करंटने रानडुकराची शिकार केल्याची वनरक्षक साबळे यांना माहिती मिळाली. वनविकास मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कुडेसावलीत दाखल होवून उमाजी मडावी, बाळू टेकाम, भोगलेश रंगारी, दशरथ गोंधळी व पंकज टेकाम यांना सापळा रचून रानटी डुकरासह जेरबंद केले. वन्यजीव कायद्यान्वये त्यांच्यावर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाच्या एका आठवड्यात तीन कारवायांमुळे अवैध तस्करांचे व शिकाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. परिसरात अवैध वृक्षतोड व शिकार होत असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)