निवेदन दिले : सत्यशोधक समाजाची मागणीचंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले आणि त्यांच्या चळवळीचे केंद्र राहिलेले आंबेडकर भवन आणि बुद्धभूषण प्रिटींग प्रेस, मुंबई २५ जून २०१६ रोजी रात्री २ वाजता रत्नाकर गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांनी पाडली. त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी करणारे निवेदन सत्यशोधक समाज जिल्हा चंद्रपूरतर्फे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात हिराचंद बोरकुटे, प्रा. एस. टी. चिकटे, डी. के. आरिकर, सूर्यभान झाडे, प्रा. माधव गुरुनले, अरुण धानोरकर, अॅड. प्रशांत सोनुले, पाडुरंग गावतुरे, अॅड. वसाके यांचा समावेश होता.सरकार एकीकडे करोडो रुपये खर्च करुन डॉ. आंबेडकरांच्या संबंधित वास्तु आणि ठिकाणाची स्मारके बनवित असताना त्यांनी ज्या बुद्धभूषण प्रिटींग प्रेस व आंबेडकर भवनमधून बहुजनांसाठी ऐतिहासिक चळवळ चालविली. तीन- तीन वृत्तपत्रे काढली, ती वास्तूच रत्नाकर गायकवाड व त्यांच्या साथीदारानी जमीनदोस्त केली. त्यामुळे देशातील करोडो जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यासाठी सरकारने त्यांना त्वरित अटक करावी. अन्यथा राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते, असा इशारा सत्यशोधक समाजाने दिला आहे. (शहर प्रतिनिधी)
रत्नाकर गायकवाडला अटक करा
By admin | Published: July 09, 2016 1:02 AM