चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्यावर गुरुवारी रात्री ९:१९ वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनातून आलेल्या नककाबधारी हल्लेखोराने बंदुकीतून गोळी झाडली. गोळी हाताला चाटून गेल्याने या हल्ल्यातून संतोष सिंह रावत थोडक्यात बचावले.
या घटनेतील हल्लेखोर आणि सूत्रधार कोण आहेत याचा छळा पोलिसांनी तत्काळ लावावा, या मागणीला घेऊन संतोषसिंह रावत यांचे समर्थकांनी आज सकाळपासूनच मुल येथील गांधी चौकात धरणे देत धरणे देत रास्ता रोको केला आहे. या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. रावत यांच्यावर हल्ला करणारे अद्यापही पोलिसांना गवसले नाही. ज्या वाहनातून हल्लेखोर आला त्या वाहनाचा क्रमांक पोलिसांच्या हाती लागला असला तरी तो नंबर फेक असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. यामुळे पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचण्यास वेळ लागत असल्याची माहिती आहे.