राजू गेडाम।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : मूलला धानाची व्यापारपेठ म्हणून ओळखल्या जाते. गोंदिया जिल्ह्यानंतर दुसऱ्या स्थानावर मूलमध्ये राईसमिलची संख्या आहे. यावर्षी धानाचे उत्पादन वाढले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत धानाची आवक वाढली आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत धानाची किंमत घटल्याचे दिसून येते. यावर्षी नवीन धानाची लागवड केल्याने धानाला भाव मिळू शकला नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.शेतकरी शेतात राबराब राबून धानाचे उत्पादन काढतो. मात्र धानाला पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नसल्याने काढलेले कर्जसुद्धा परतफेड करणे अवघड जाते. जास्त प्रमाणात चालत असलेला परभणी, जयश्रीराम धानाव्यतिरिक्त नवीन धानाचे वाण ज्यात जोरदार, मोहरा, मोहक आदींचा भरणा झाल्याने धानाला भाव मिळू शकला नाही. डिसेंबर २०१७ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत ७१ हजार ८२० क्विंटल धानाची आवक आली. ज्याची किंमत १७ कोटी २९ लाख ६९ हजार ६४२ रुपये होती तर डिसेंबर १८ मध्ये ५६ हजार ८३३ क्विंटल धानाची आवक झाली. जवळपास डिसेंबर महिन्यात १५ हजार क्विंटल धानाची आवक कमी झाली. शेतकऱ्यांनी धानाचा भाव वाढेल, यासाठी धान बाजार समितीत आणले नसावे, असे दिसून येते. मात्र जानेवारी २०१९ मध्ये धानाची आवक ९ हजार क्विंटलने वाढली असली तरी डिसेंबर २०१७ च्या तुलनेत कमी वाटते. मागील जानेवारी २०१८ मध्ये ५० हजार ५३० क्विंटल धानाची आवक झाली तर जानेवारी २०१९ मध्ये ६५ हजार ९०० क्विंटल धान बाजार समितीत आले. जानेवारी १८ मध्ये १२ कोटी ६४ लाख १० हजार ९६६ रूपये किंमतीचे धान आले. जानेवारी २०१९ मध्ये १३ कोटी ५७ लाख ९३ हजार ४९२ रूपयांचे धान विक्रीसाठी बाजार समितीत आले. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धानाची आवक काही प्रमाणात वाढली असली तरी यावर्षी उत्पादन झालेला माल बाहेर खासगीत विक्री केल्याचे बोलले जात आहे. शेतकºयाचे उत्पादन वाढावे व त्यांना योग्य भाव मिळावा, यासाठी वेळोवेळी मागणी केली जाते. मात्र शेतकºयांना शेतात राबराब राबल्यानंतरही योग्य भाव मिळत नसल्याने शेतकºयांची मानसिकता नैराश्येकडे जात असल्याचे दिसून येते. यासाठी धानासोबतच शेतकऱ्यांनी विविध पिकांचे उत्पादन घेतल्यास आर्थिक स्तर सुधारण्यास मदत होऊ शकते. एकंदरीत धानाचे उत्पादन मागील वर्षीपेक्षा जास्त प्रमाणात झाले असले तरी धानाची किंमत शेतकऱ्यांना समाधानकारक मिळाली नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर दिसत आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील डिसेंबर महिन्यात धानाची आवक यावर्षीपेक्षा जास्त दिसून येते. तसेच जानेवारीत मात्र मागील वर्षीपेक्षा यावर्षी धानाची आवश्यक जास्त आहे. तुलनात्मकरित्या डिसेंबर, जानेवारी महिन्याची सरासरी बघता काही प्रमाणात फरत दिसून येते. यावर्षी धानाचे नवीन वाण जोरदार, मोहरा, मोहक याचे उत्पादन झाले असले तरी त्याला भाव मिळू शकला नाही. धानाची आवक सुरूच असून नियमित लिलाव सुरू आहे.-चतूर मोहुर्ले,सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, मूल.
बाजार समितीत धानाची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 9:45 PM
मूलला धानाची व्यापारपेठ म्हणून ओळखल्या जाते. गोंदिया जिल्ह्यानंतर दुसऱ्या स्थानावर मूलमध्ये राईसमिलची संख्या आहे. यावर्षी धानाचे उत्पादन वाढले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत धानाची आवक वाढली आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत धानाची किंमत घटल्याचे दिसून येते. यावर्षी नवीन धानाची लागवड केल्याने धानाला भाव मिळू शकला नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
ठळक मुद्देमात्र किंमत घटली : शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच, भाव वाढण्याची प्रतीक्षा