लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीन परिसरात खोदकाम कारताना अश्मयुगीन हत्यारे आढळून आली. त्यामुळे येथे संग्रहालय बनविण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत संग्रहालय बनवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय स्वत:चे अश्मयुगीन संग्रहालय असणारे देशातील एकमेव महाविद्यालय म्हणून भविष्यात ओळखले जाणार आहे.चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सुरू आहे. तेथे झरपट नाल्याच्या किनाऱ्यालगतच्या पापामिया टेकडी नावाने ओळखल्या जाणाºया भागात अश्मयुगीन मानवाच्या हत्यार निर्मितीचा कारखाना आढळून आला. या कारखान्यास महाविद्यालय बांधकामाने धोका निर्माण झाला असून हे ऐतिहासिक स्थळ महाविद्यालयाखाली गाडले जाण्याची भीती होती. त्यामुळे इतिहास अभ्यासक अमित भागत यांनी सरकारला विनंती करून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्था व राज्य पुरातत्व विभागाने उत्खनन करून अश्मयुगीन हत्यारे व जीवाश्मांचे संग्रहालय बनवावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना केली. त्यामुळे मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी नुकतीच मुंबईत एक बैठक घेतली. बैठकीला पुरातत्व अधिकारी, जिल्हाधिकारी कुणाल खेमनार, अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे उपस्थित होते. बैठकीत ७५ टक्के भागाचे उत्खनन करून तेथे अश्मयुगीन संग्रहालय बनवण्याचा निर्णय घेण्यात आला.इ. स. सन पूर्व दीड लाख वर्षे ते इ. स. पूर्व दहा हजार वर्षापर्यंत सातत्याने अश्मयुगीन मानवाचा वावर राहिल्याचे तेथील वैविध्यपूर्ण दगडी हत्यारावरुन दिसून येते.पापामिया टेकडी स्थळाचा शोध भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेने १९६० मध्ये लावला होता. परंतु कालांतराने त्याकडे दुर्लक्ष झाले. भागत यांनी याबाबत राज्य व केंद्राकडे सतत प्रयत्न केले.वालुकाश्म दगडात आढळली हत्यारेमेडिकल कॉलेज परिसरात आढळलेल्या पुराणाश्मयुगातील हातकुऱ्हाडी, फरश्या, तासण्या, खोदण्या आदींचा समावेश आहे. त्याशिवाय मध्याश्म व नवाश्मयुगातील तीक्ष्ण, सूक्ष्म पाषाण हत्यारेसुद्धा मोठ्या संख्येने आढळत आहेत. त्याचबरोबर विविध प्राण्यांचे जीवाश्म आढळण्याची शक्यता आहे. लाखोंच्या संख्येने पाषाण युगातील हत्यारे येथे गाडली गेली असल्याचा अंदाज इतिहास अभ्यासक अमित भागत यांनी वर्तवला आहे. ‘चर्ट’ या रूपांतरित कठीण वालुकाश्म दगडात ही हत्यारे बनवल्याने ती अतिशय सुबक, रेखीव व अणकुचीदार आहेत.
मेडिकल कॉलेजमध्ये बनणार अश्मयुगीन हत्यार संग्रहालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 10:00 PM
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीन परिसरात खोदकाम कारताना अश्मयुगीन हत्यारे आढळून आली. त्यामुळे येथे संग्रहालय बनविण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत संग्रहालय बनवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
ठळक मुद्देबैठकीत निर्णय : देशातील पहिले महाविद्यालय ठरणार