शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
4
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
5
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
6
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
8
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
10
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
11
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
12
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
14
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
15
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
16
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
18
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
19
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
20
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?

आशा वर्कर महिलांचा मेळावा

By admin | Published: August 26, 2014 11:22 PM

आशा वर्करची बैठक आनंद भवनात शनिवारी नंदा मुळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रास्ताविक भाषणात इंदू पिंगे म्हणाल्या, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत

चंद्रपूर : आशा वर्करची बैठक आनंद भवनात शनिवारी नंदा मुळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रास्ताविक भाषणात इंदू पिंगे म्हणाल्या, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आशा वर्कर विना वेतन तसेच विना मानधनाने काम करीत आहेत. आज ना उद्या केलेल्या सेवेचा लाभ मिळेल, या आशेवर कुठल्याही प्रकारची तक्रार न करता आशा वर्कर काम करीत आहेत. आता आरोग्य सहायक म्हणून अंगणवाडी सेविकेची नव्याने नियुक्ती केल्या जात आहे. कंत्राटी पद्धती असली तरी तिलाही तीन हजार रुपये मानधन दिल्या जाणार आहे. निवडीसाठी अर्ज मागविण्यात आले असून वयोमर्यादा ३० वर्षे ठेवण्यात आली आहे.केंद्र शासनाच्या योजनेमध्ये आम्ही काम करीत असल्याने आशा वर्करसाठी वयोमर्यादा शिथील करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली. जयमाला बारसागडे म्हणाल्या, वयाच्या नावाखाली आशा वर्करला डावलने हा त्यांच्यावर फार मोठा अन्याय आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्रशासित योजना आहे आणि आम्ही देखील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत सहा वर्षांपासून काम करीत आहोत. आमची सेवा व कामाचा अनुभव लक्षात घेऊन अंगणवाडी सेविकेची नव्याने निवड करताना आशा वर्करसाठी वयोमर्यादा शिथील करण्यात यावी. प्रा. रमेशचंद्र दहीेवडे यांनी देखील मेळाव्याला मार्गदर्शन केले. विना वालदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. मेळावा यशस्वी करण्याकरीता चित्रलेखा मोटघरे, सुनंदा चुनारकर, प्रज्ञा साव यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)