लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ओबीसीसमाजाची जातनिहाय जनगणना करावी, या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने २ मार्च २०२० पासून ओबीसी अस्मिता रथयात्रेला बल्लारपूर मार्गे जिल्ह्यात सुरूवात झाली. या मोहिमेतंर्गत प्रत्येक गावात जनजागृती सभा घेण्यात आली.राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, शामकांत लेडे, विजय मालेकर, अशोक पोफळे, रमेश ताजने, सूर्यकांत साळवे, गणपती मोरे, विवेक खुंटेमाटे, योगेश पोतराजे यांच्या हस्ते अस्मिता रथयात्रेचा प्रारंभ झाला. बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे येथे सर्वप्रथम रथयात्रा पोहचली. यावेळी पं. स. उपसभापती गोविंदा पोडे, मनोहर देऊडकर, डॉ. देविदास पोडे, सुनील शेंडे, गुलाब उपरे उपस्थित होते. विसापूरला रथयात्रा पोहचल्यानंतर नागरिकांनी स्वागत केले. बल्लारपूर, बामणी येथील कार्यक्रमाप्रसंगी सुभाष ताजने, कार्तिक जीवतोडे, संजय निखाडे, मालेकर, वरारकर, विनोद मोरे, मोहन देरकर, संगिता ढोंगे, आशा निकोडे, शिल्पा काटोले, लता किंगरे उपस्थित होते. लावारी, मानोरा, कवडझई, कोठारी, आमडी, पळसगाव येथेही सभा झाली. अजयपूर, वेळवा, नवेगाव, नवेगाव मोरे, आष्टा, चेक आष्टा, पोंभुर्णा, देवाळा येथेही जागृती करण्यात आली.