शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

मारहाण करून चंद्रपूरच्या बसवाहकाला लुटले, गणेशपेठमध्ये गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2017 8:49 PM

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची सहल घेऊन आलेल्या खासगी बसच्या वाहकाला बेदम मारहाण करून त्यांच्याजवळची रक्कम लुटणा-या तिघांना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली.

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची सहल घेऊन आलेल्या खासगी बसच्या वाहकाला बेदम मारहाण करून त्यांच्याजवळची रक्कम लुटणा-या तिघांना गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. विकासनगर, सावली (जि. चंद्रपूर) येथील राजू दितुराम गंगवाणी (वय ४७) हे एमएच ३१/ सीई ०५५५ क्रमांकाच्या खासगी (ट्रॅव्हल्स) बसवर वाहक आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची सहल घेऊन ते चंद्रपूर जिल्ह्यातून शेगावला गेले होते. बुधवारी सायंकाळी ते नागपुरात परत आले. विद्यार्थ्यांना येथील रमण सायन्स केंद्र दाखवायचे होते. मात्र, सायंकाळ झाल्यामुळे त्यांनी मुक्कामाचा निर्णय घेतला. रमन सायन्स केंद्राच्या बाजूलाच एका हॉलमध्ये विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तर, गंगवाणी बाजुला बस उभी करून बसमध्येच झोपले.रात्री १०.३० च्या सुमारास आरोपी तनवीर हुसेन उर्फ तन्नू साबीर हुसेन (वय २८), रहीम खान फारूक खान (वय १८) आणि अब्दुल रहमान अख्तर अली (वय २१, रा. इंदिरानगर झोपडपट्टी) तेथे आले. त्यांनी गंगवाणीला झोपेतून जागे केले. ही बस कुणाची आहे, येथे कशी लावली, अशा प्रकारे दमदाटी करीत त्यांनी गंगवाणीला मारहाण केली. आरोपींसोबत बचावासाठी झटापट करताना गंगवाणी खाली पडले. ती संधी साधून आरोपींनी त्यांच्या खिशातील ४५०० रुपये हिसकावून पळ काढला. जाताना आरोपींनी बसची काचही फोडली. दरम्यान, आरडाओरड ऐकून बसचालक आणि अन्य जण तेथे जमा झाले. नागरिकांनी या घटनेची तक्रार गणेशपेठ ठाण्यात नोंदविण्याचा सल्ला देऊन पोलीस ठाण्याचा पत्ताही सांगितला. त्यानुसार गंगवानी यांनी ठाण्यात तक्रार नोंदवली.काही वेळेतच गवसले आरोपीपोलिसांनी घटना तसेच आरोपींचे वर्णन ऐकून घेतल्यानंतर लगेच बाजूला असलेल्या इंदिरानगर झोपडपट्टीकडे धाव घेतली. त्या भागात आरोपी नजरेस पडताच गंगवाणीने त्यांची ओळख पटविली. त्यानुसार उपरोक्त तिघांनाही अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.