मागील हंगामात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रशासनाने मार्च महिन्यात टाळेबंदी जाहीर केली. यावेळी शेतकऱ्यांच्या घरात कापूस, चणा, तूर आदी शेतमाल घरात होता. टाळेबंदी कधी संपेल, याची शाश्वती नव्हती. वरोरा बाजार समिती पदाधिकारी, संचालक मंडळ, अधिकारी यांनी ही बाब खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांना सांगताच त्यांनी शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी सुरू करण्याकरिता शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला व कोरोना विषाणूचे नियम पाळत शेतमाल खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. ऐन हंगामात ज्यांच्या बैलाचा मृत्यू झाला, असे शेतकरी दादा धोत्रे, विठ्ठल बालपांडे, रामदास डांगे, रवींद्र पावडे, जिजाबाई वांढरे, किसन पुसदेकर, संजय काकडे यांना बाजार समितीचे सभापती राजेंद्र चिकटे, उपसभापती देवानंद मोरे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले.
060921\img_20210906_152302.jpg
warora