चंद्रपूर : बहुजन हिताय ऑटो चालक मालक सहकारी पतसंस्थेेतर्फे लिलाधर वाकडे यांना आत्मनिर्भर करण्यासाठी ऑटो खरेदीसाठी कर्ज मिळवूण देण्यात मदत करण्यात आली. बहुजन हिताय नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष डी. बी. रामटेके यांच्या हस्ते वाकडे यांना ॲाटोची किल्ली देण्यात आली. बहुजन हिताय ऑटोचालक मालक सहकारी पतसंस्था ऑटो चालकांच्या कल्याणासाठी मागील १७ वर्षांपासून कार्य करीत आहे. त्यामुळे अनेक ऑटोचालकांना लाभ मिळाला असून अनेकजण आत्मनिर्भर झाले आहेत. त्यानुसार लिलाधर वाकडे यांना ऑटो खरेदीसाठी सहकार्य करण्यात आले. यावेळी बहुजन हिताय ऑटोचालक-मालक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर हुमणे, उपाध्यक्ष ऋषी ताकसांडे, दिलीप वावरे, ज्योती सहारे, कुंदर रायपुरे, प्रकाश मांढरे, सुरेश मुन, विलास जुमडे, महादेव कवाडे, राकेश खोब्रागडे, रवी दुर्योधन, उमेश मून, विजय एकोणकर, विठ्ठल बटाले, जया हुमणे, सुनीता गावंडे, संजना मोहितकर, मंजू मेश्राम, चंद्रमणी ठेमस्कर, परमानंद हुमणे आदी उपस्थित होते.
बहुजन हिताय संघटनेतर्फे बेरोजगारांना सहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2020 4:29 AM