या ठिकाणी सर्व महत्त्वाची पदे रिक्त असल्याने प्रभारी पदभार देऊन कार्यालयाचा गाडा हाकणे सुरू आहे. मात्र वरिष्ठांचे याकडे लक्ष नसल्याने विकास कामांना खीळ बसली आहे. रिक्त पदामध्ये तालुका कृषी अधिकाऱ्यांसह मंडळ कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक ३, कृषी सहायक २, शिपाई ३. ट्रेसर २, वाहन चालक १ अशी १३ पदे रिक्त आहेत. तालुका कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी ही दोन्ही पदे अतिरिक्त कारभार देऊन सामान्य सुरू आहे. कृषी पर्यवेक्षकाचे महत्त्वाचे पद असताना कृषी सहायकांकडे अतिरिक्त पदभार देऊन कामकाज पाहावे लागत आहे. त्यामुळे कामावर बराच मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. रिक्त असणाऱ्या पदाबाबत जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी विभागीय कृषी सहसंचालक नागपूर विभागीय कृषी आयुक्त पुणे, प्रधान सचिव मुंबई यांच्याकडे रिक्त पदाचा तपशील पाठवला आहे. एकीकडे राज्य शासन शेकडो योजनांची अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक काढत आहे. मात्र या योजना राबविण्यासाठी अधिकारी व कर्मचारी नसल्याने त्याचे फलित पाहावयास मिळत नाही. याची दखल घेऊन रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला रिक्त पदाचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:28 AM