चंद्रपूर : उन्हाची तीव्रता झपाट्याने वाढत असताना व उष्णतेचा पारा जिल्ह्यात ४३.२ अंश सेल्सिअस वर पोहचला असताना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी बबली व तिच्या पिल्लांची पानवठ्यात मस्ती की पाठशाला सुरू आहे.
सध्या उन्हाळ्याच्या गर्मीमुळे लोकांसोबत वन्यप्राणी देखील लाही लाही झाले आहेत. या उन्हाचा फटका ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात बबली आणि तिच्या बछड्यांनाही बसला. मग काय..! आपल्या तीन बछड्यांना घेऊन बबली थेट पानवट्यावर पोहोचली अन् सुरु झाली मस्ती की पाठशाला.
बबली व तिचे तीन पिल्ल पानवठ्यात आई सोबत मस्ती करीत आहेत. आई व पिल्लांची मस्ती एका पर्यटकांनी कॅमेराबद्ध केली आहे. ताडोबातील बबली व तिच्या पिल्लांचा व्हिडिओ हा सध्या समाज माध्यमावर चांगलाच सार्वत्रिक झाला आहे.