शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
3
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
4
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
5
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
7
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
8
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
9
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
10
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
11
TATA IPL Auction 2025 Live: व्यंकटेश अय्यरवर कोलकाताचा मोठा सट्टा; २३.७५ कोटींना घेतले विकत
12
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
13
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
14
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
15
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
16
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
18
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
19
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
20
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात

एटीएम केंद्रांची सुरक्षा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:13 AM

अलीकडे चोरी, दरोडे लुटमारीच्या घटना वाढत आहे. पैशासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक काहीही करताना दिसून येतात. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे अज्ञात दरोडेखोरांनी गॅस कटरने एटीएम फोडले.

ठळक मुद्देअनेक एटीएम केंद्रात सुरक्षा रक्षकच नाही : केवळ सीसीटीव्ही कॅमरे लावून यंत्रणा मोकळी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अलीकडे चोरी, दरोडे लुटमारीच्या घटना वाढत आहे. पैशासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक काहीही करताना दिसून येतात. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे अज्ञात दरोडेखोरांनी गॅस कटरने एटीएम फोडले. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने जिल्हाभरात स्टिंग आॅपरेशन केले असता ज्या ठिकाणी रोख रक्कम असते, त्या एटीएम केंद्रांची सुरक्षाच धोक्यात असल्याचे दिसून आले.चंद्रपुरातील एटीएम केंद्र कितपत सुरक्षित आहेत, हे पाहण्यासाठी ‘लोकमत’ने बुधवारी रात्री शहरात फेरफटका मारून एटीएम केंद्रांची पाहणी केली. यावेळी काही बँकांच्या एटीएम केंद्रात सुरक्षा रक्षक तैनात असल्याचे दिसले. काही ठिकाणी तर बंदुकधारी सुरक्षा रक्षक दिसून आले. मात्र बहुतांश एटीएम केंद्रात सुरक्षा रक्षकच दिसून आले नाही. नव्हेतर सुरक्षा रक्षकाविनाच या केंद्रांचा कारभार सुरू असल्याचे दिसले. चंद्रपूर शहरात स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बॅक, बँक आॅफ महाराष्टÑ, बँक आॅफ बडोदा, आयसीआयसी बँक, आयडीबीआय बँक यासारख्या राष्टÑीयकृत बँक आणि मध्यवर्ती सहकारी बँक, अर्बन बँक यासारख्या स्थानिक बँकांच्या शाखा चंद्रपुरात कार्यरत आहेत. या सर्व बँकांचे एटीएम केंद्र शहरातील विविध भागात कार्यरत आहेत. यातील बहुतांश एटीमएम केंद्रात रात्रीच्या सुमारास सुरक्षा रक्षक दिसले नाही. कस्तुरबा मार्गावरील स्टेट बँकेचे व छोटाबाजारातील आयसीआयसीआय, युनियन बँक, तुकूम येथील स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सीस बँक, बँक आॅफ इंडिया या बँकाच्या एटीमएम केंद्र दिवसाही चौकीदार व सुरक्षा रक्षक दिसले नाही.वरोरा शहरात बहुतांश बँकांचे एटीएम आहेत. आनंदवन, आनंद निकेतन महाविद्यालयासमोरील एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नाही. मात्र वरोºयातील काही एटीएम केंद्रात दिवसा सुरक्षा रक्षक नसला तरी रात्री मात्र सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली जात असल्याचे दिसले.सिंदेवाहीत स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र व बँक आॅफ इंडिया, यांचे तीन एटीएम केंद्र आहेत. बुधवारी रात्री या तीनही एटीएम केंद्रात एकही सुरक्षा रक्षक आढळले नाही. खासगी कंपनीमार्फत सुरक्षा रक्षक नेमले आहेत, अशी माहिती मिळाली. मात्र प्रत्यक्षात सुरक्षा रक्षक दिसले नाही. बँक आॅफ इंडियाचे एटीएम तर पैसे नसल्याच्या सबबीखाली नेहमीच बंद असते, असे नागरिकांनी सांगितले.नागभीड येथे चारपैकी तीन एटीएम केंद्रात सुरक्षा रक्षक नाही. केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या केंद्रातच २४ तास सुरक्षा रक्षक असतो. गोंडपिपरीत बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ इंडिया व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचे तीन केंद्र कार्यरत आहेत. त्यातील केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएममध्येच सुरक्षा रक्षक २४ तास तैनात असल्याचे आढळले.चिमुरात एकूण तीन एटीएम ग्राहकाच्या सेवेत आहेत.यातील बँक आॅफ महाराष्ट्र व स्टेट बँक आॅफ इंडिया या दोन्ही बँकेच्या एटीएममध्ये प्रारंभापासूनच सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केली नाही. तसेच या दोन्ही एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा नियमित सुरू नसतात.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएममध्ये मात्र सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.ेसुगावा लागेल; मात्र घटना टाळण्यासाठी काय?जिल्ह्यातील विविध शहरातील अनेक एटीएम केंद्राचा कारभार सुरक्षा रक्षकाविनाच सुरू आहे. या एटीएम केंद्रात केवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावून संबंधित यंत्रणा मोकळी झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे एखादी अनुचित घटना घडली तर त्याचा सुगावा लागू शकतो. मात्र घटना टाळण्यासाठी यंत्रणा हतबल ठरण्याची शक्यता सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येते.स्टेट बँकेचे दोन्ही एटीएम वाऱ्यावरजीवती : जीवती शहरात एक एटीएम तर पाटण येथे एक एटीएम असे दोन्ही एटीएम हे स्टेट बँक आॅफ इंडियाचे आहेत. पण या दोन्ही एटीएममधील सुरक्षा वाऱ्यावर आहे. हा परिसर नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. मात्र येथील एटीएम केंद्रात गेल्या अनेक वर्षांपासून सुरक्षा रक्षक ठेवण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, या केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरेही नसल्याचे दिसून आले. जीवती येथील एटीएममधून हरविलेल्या एटीएम कॉर्डद्वारे पैसे काढण्यात आल्याची घटना घडली होती. मात्र येथे कॅमेरे नसल्याने त्या व्यक्तीला पकडणे पोलिसांना शक्य झाले नाही.

टॅग्स :atmएटीएम