लोकमत न्यूज नेटवर्कआवारपूर : संपूर्ण व्यवहार कॅशलेस करण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. मात्र आवारपूर वसाहतीत असलेल्या ए.टी.एम मशिन नादूरस्त असल्यामुळे मशीन एटीएम कॉर्ड स्विकारत नाही. त्यामुळे एटीएममधून पैसे निघत नाही. ऐन सनासुदीच्या काळात एटीएम नादूरस्त असल्यामुळे ग्राहकांच्या बँकेसमोर रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.आवारपूर, नांदाफाटा, बिबी, पालगाव, नोकरी, हिरापूर, संगोडा, अंतरगाव या गावांची लोकसंख्या जवळपास ५० हजार आहे. या सर्व गावांना जोडणारी भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा आवारपूर हि एकमेव राष्ट्रीयकृत बँक आहे. या बँकेत शासकीय कर्मचारी, व्यापारी, मजूरदार, शेतकरी, कामगार वर्ग, विद्यार्थी, आदी सर्वांचे बँक खाते या बँकेत आहेत. दिवसभर तुडुंब गर्दी बँकेत असते. या बँकेतील एटीएममधून पैसे काढण्यासाठी परिसरातील नागरिक 3 ते ५ किमीचे अंतर कापून येत असतात. मात्र एटीएम मशीन मागील आठवडाभरापासून नादूरस्त असल्यामुळे एटीएममधून पैसे निघत नाही. ऐन सणासुदीतच्या काळातच एटीएम बंद असल्याने नागरिकांना अडचण जात आहे.नांदा येथे बँक व एटीएमची मागणीआवारपूर परिसरात एकच राष्ट्रीयकृत बँक असल्यामुळे नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी नांदाफाटा येथे राष्ट्रीयकृत बँक व एटीएमची मागणी अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.मागील ७ दिवसांपासून एटीएम मशिनमध्ये एटीएम कॉर्ड स्वॅप होत नसल्यामुळे पैसे निघत नाही. सन असल्याने एटीएममध्ये नागरिकांच्या रांगा लागत आहेत. एटीएम मशिनमधील बिघाड एक दिवस बंद ठेवून दुरुस्ती करावी. मात्र अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.- जगन बुढे - नागरिकमला माझ्या गाडीची किस्त भरायची असल्याने मी बँकेत गेलो. परंतु, तिथे गर्दी असल्याने एटीएम मधून ट्रान्सफर करावे या उदेशाने एटीएममध्ये गेलो. परंतु, मशिन एटीएमचा स्वीकार करत नसल्याने मला पैसे भरण्यास अडचण झाली.- मारोती बावणे, नागरिक
आठवडाभरापासून एटीएम मशीन नादुरस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 11:29 PM
संपूर्ण व्यवहार कॅशलेस करण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे.
ठळक मुद्देबँकेपुढे नागरिकांच्या रांगा : अधिकाºयांनी लक्ष द्यावे