शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

घरफोड्या करणारी परप्रांतीय टोळी अटकेत

By admin | Published: September 17, 2016 1:18 AM

मागील चार ते सहा महिन्यांपासून चंद्रपूरसह वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ अशा जिल्ह्यात घरफोड्या करून पसार होणाऱ्या ...

सव्वाआठ लाखांच्या दागिन्यांसह पाच दुचाकी हस्तगतचंद्रपूर : मागील चार ते सहा महिन्यांपासून चंद्रपूरसह वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ अशा जिल्ह्यात घरफोड्या करून पसार होणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या टोळीकडून पाच दुचाकी वाहने आणि आठ लाख २६ हजार रूपयांचे सोन्या-चांदीचे दागीणे हस्तगत करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी शुक्रवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या कारवाईची माहिती दिली. १० सप्टेंबरला गणेशोत्सवादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलींगवर असताना पडोली मार्गावरील त्रीमूर्ती धाब्यावर चार युवक बसलेले दिसले. त्यापैकी एकाजवळ काळ्या रंगाची सॅस बॅग होती. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने या पथकाने त्यांच्या बॅगची झडती घेतली असता बॅगमध्ये मोठा पेचकस, लोखंडी टॉमी, एक अ‍ॅडजेस्टेबल पाना असे घरफोडीचे साहित्य आढळले. त्यांच्याकडे नंबर प्लेट नसलेल्या दोन दुचाक्याही आढळून आल्या. यावरून संशय बळावल्याने ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता सहा ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली त्यांनी दिली. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा अणि चिमूरमध्ये एका ठिकाणी चोरी केल्याची कबुली देवून त्यांनी चोरी केलेला माल दाखवून दिला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल उईके, सहाय्यक फौजदार दौलत चालखुरे, रऊफ शेख, पोलीस हवालदार पद्माकर भोयर, महेंद्र भुजाडे यांच्या पथकाच्या दक्षतेमुळे ही टोळी गवसली. या टोळीकडून अजून बरीच माहिती उघडकीस येण्याची शक्यता संदीप दिवाण यांनी वर्तविली. पत्रकार परिषदेला अपर पोलीस अधीक्षक हेमराजसींग राजपुत उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)मध्य प्रदेशातही गुन्हे दाखलया टोळीच्या म्होरक्याचे नाव खडकसींग गुंगा अलावा (३५) असे असून तो मध्यप्रदेशातील कुक्षी जिल्ह्यातील तांडा पोलीस स्टेशन अंतर्गत बराड या गावी राहणारा आहे. यासोबतच परमसिंग नवरसिंग अलावा (२४), खडकसिंग बायसिंग उर्फ रमेश अलावा (२५) आणि सुरेश अकराम सिंघार (२०) हे त्याचे साथीदार आहेत. पोलिसांनी एक पथक तयार करून या चौघांसह त्यांचे गाव गाठले असता, अलीराजपूर जिल्ह्यातील एका सोनारास दागीणे विकल्याची कबुली त्यांनी दिली. त्यावरून सोनारालाही अटक करून आणण्यात आले आहे. मध्यप्रदेश पोलिसांतही या सर्वांवर वेगवेगळ्या घटनांमध्ये गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या रेकॉर्डवर ते फरार असल्याची नोंद आहे.