लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून बाप्पाची निर्मिती करता येते हे नवीन भावी पिढीतील मुलांच्या मनावर ठसविल्याने त्यांनी आपल्या कल्पनेचा वापर करून अत्यंत देखण्या, आकर्षक मूर्तीची निर्मिती केली. चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी ही कल्पना अंमलात आणण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. यातून हा कलाप्रवास साकार झाला आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांबू मिळतो. त्यामुळे शासनाने बांबूकडे विशेष लक्ष देत आहे. बांबूचे मूल्यवर्धन करून त्यापासून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात चिचपल्ली येथील केंद्राचा मोठा वाटा आहे. बांबू विषयावर विविध अभ्यासक्रम शिकविल्या जात आहेत. बांबूची मुळे व टाकावू बांबूपासून सुंदर अशा गणेश मूर्ती साकार करता येतात. चिमुकल्या हातांना कौशल्याची जोड दिल्यास मनमोहन वस्तु तयार होऊ शकतात, हे बीआरटीसीचे सिद्ध करून दाखविले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेश मुर्त्यांचे शुक्रवारी प्रदर्शन पार पडले. ‘आपला बांबू गणपती’ स्पर्धेअंतर्गत मधून शाळेय मुलांनी आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या पर्यावरणपूरक साधन सामग्रीचा वापर करून पर्यावरणपुरक उत्सव साजरा करता येऊ शकतो, संदेश विद्यार्थ्यांनी दिला आहे. स्पर्धेकरिता १५ शाळेतील १०२ विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक पाटील यांनी मुलांच्या कल्पकतेची स्तुती केली. बांबूची मुळे व टाकावू बांबूपासून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या बाप्पाच्या मुर्त्या भाविकांसाठी लक्षवेधी ठरल्या आहेत.बीआरटीसीत बांबू अभ्यासक्रमबांबू हा कल्पवृक्ष असल्याने त्यापासून केवळ जीवनोपयोगी सुप-टोपल्या बनविणे पुरेसे नाही, हे लक्षात आल्यानंतर सरकारने बांबू उद्योग ही संकल्पना तयार करून अनेक योजना सुरू केल्या. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थी तसेच महिलांना बांबूपासून विविध प्रकारच्या आधुनिक वस्तु तयार करण्याचे प्रशिक्षण चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातून दिल्या जात आहे. त्यामुळे बांबू प्रशिक्षणाकडे विविध अभ्यासशाखेतील विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे दिसून येते.
१२० विद्यार्थ्यांनी तयार केल्या बांबूपासून आकर्षक गणेश मूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 12:49 AM
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांबू मिळतो. त्यामुळे शासनाने बांबूकडे विशेष लक्ष देत आहे. बांबूचे मूल्यवर्धन करून त्यापासून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात चिचपल्ली येथील केंद्राचा मोठा वाटा आहे. बांबू विषयावर विविध अभ्यासक्रम शिकविल्या जात आहेत.
ठळक मुद्देचंद्रपुरातील १५ शाळांचा सहभाग । बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचा उपक्रम