लोकमत न्युज नेटवर्कवढोली : तालुक्यात रेती चोरांचा धुमाकुळ सूरू होता. अश्यातच चोरीची रेती साठवणूक करून ठेवलेल्या येनबोथला नदीघाटाजवळ महसूल विभागाने धाड टाकली. रेतीसाठा जप्त केला. रेतीचा पंचनामाही केला. यानंतर लगबगीने गुरुवारी दुपारी तहसिल कार्यालयात लिलाव ठेवला. लिलावात व्यावसायिकही मोठया उत्साहाने सहभागी झाले. मात्र मोक्यावर जाहिरनाम्यात उल्लेख केल्यानुसार ९०० ब्रास रेतीसाठाच नसल्याचा आक्षेप सहभागी व्यावसायिकाने नोंदविल्याने लिलाव रद्द करण्यात आला आहे.वैनगंगा नदी किनाऱ्यावर असलेल्या येनबोथला रेतीघाटानजीक तस्करांनी अवैध रेतीचा मोठा साठा जमा केला. ही बाब लक्षात येताच गोंडपिपरी तालुका प्रशासनाने येनबोथला येथे मोक्यावर धाव घेतली. आणि रेतीसाठा जप्त केला. गोंडपिपरी तालुक्यातील रेतीचा दर्जा उत्तम असल्याने येथील रेतीला मोठी मागणी आहे. मात्र सध्या रेतीघाट बंद असल्याने रेतीची चोरी करण्यासाठी तस्करात मोठी स्पर्धा आहे. अश्यातच चोर मार्गाने साठवून ठेवलेल्या येनबोथला येथील रेतीसाठयावर महसूल विभागाने धाड टाकली. पंचनामाही केला. गुरुवारी रेतीची लिलाव प्रक्रिया बोलविली. व्यवसायिकही सकाळपासून हजर झाले. तब्बल नऊ व्यावसायिकांनी यात सहभाग नोंदविला. सहभागाची रक्कमही भरली. गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे, तहसीलदार के.डी.मेश्राम यांच्या उपस्थितीत लिलाव प्रक्रिया सुरु झाली. यावेळी रेतीसाठा लिलावात स्थानिकांना प्राधान्य द्यावी, ही मागणी रेटून धरली. या सोबतच प्रत्यक्षदर्शी मोक्यावर जाहिरनाम्यावर उल्लेख केल्याप्रमाणे ९०० ब्रास रेतीसाठा नाही. मोघम आकडा टाकल्याचा आक्षेप एका सहभागी व्यावसायिकांनी नोंदविला. यामुळे गुरुवारी येथील लिलाव रद्द करण्यात आला.येनबोथला येथील मोक्यावर प्रत्यक्षदर्शी ९०० ब्रास रेतीसाठा नसल्याचा आक्षेप लिलावात सहभागी व्यवसायाकांनी नोदवला आहे. यामुळे आता रेतीसाठयाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खात्री करुनच यापुढे लिलाव केला जाणार आहे.- के.डी.मेश्राम, तहसीलदार,गोंडपिपरी
गोंडपिपरीतील चोरीच्या रेतीचा लिलाव रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 5:00 AM
लोकमत न्युज नेटवर्क वढोली : तालुक्यात रेती चोरांचा धुमाकुळ सूरू होता. अश्यातच चोरीची रेती साठवणूक करून ठेवलेल्या येनबोथला नदीघाटाजवळ ...
ठळक मुद्देमोक्यावर ९०० ब्रास रेतीसाठाच नाही, व्यावसायिकांनी नोंदविला आक्षेप