शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

ऑटोमुळे आर्थिक बळासह आत्मविश्वास दुणावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 10:41 PM

एक गृहिणी व दोन मुलांची आई, दिवसभर आणि रात्री उशीरापर्यंत, घरच्या कुणाचीही सोबत न घेता ऑटो चालविते. या गृहिणीच्या परिश्रमाला, तिच्या हिंमतीला आणि प्रचंड आत्मविश्वासाला मानावेच लागेल. बल्लारपूर येथील बीटीएस प्लांट भागात राहणाऱ्या सपना रोशन पाटील हे या आत्मविश्वासी गृहिणीचे नाव आहे.

ठळक मुद्देप्रेरणादायी धाडस : बल्लारपूरच्या महिला ऑटोचालक सपना पाटील

वसंत खेडेकर।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : एक गृहिणी व दोन मुलांची आई, दिवसभर आणि रात्री उशीरापर्यंत, घरच्या कुणाचीही सोबत न घेता ऑटो चालविते. या गृहिणीच्या परिश्रमाला, तिच्या हिंमतीला आणि प्रचंड आत्मविश्वासाला मानावेच लागेल. बल्लारपूर येथील बीटीएस प्लांट भागात राहणाऱ्या सपना रोशन पाटील हे या आत्मविश्वासी गृहिणीचे नाव आहे.सपनाला संसाराचा गाडा हाकण्याकरिता ऑटो चालवावा लागत आहे. त्यांचे माहेर बल्लारपूरचेच. लग्न नागपूर येथील रोशन पाटील यांच्याशी झाले. पाटील हे नागपूरला आटो चालवायचे. ते बल्लारपूरला आले, ऑटो चालवू लागले व येथेच स्थायिक झाले. त्यांची पत्नी एका शाळेत कामाला जावू लागल्या. घरी ऑटो असल्याने आवड म्हणून त्यांनी आटो चालविणे शिकले. सारे नीट चालत असतानाच पती रोशनच्या डोक्याची नस दबली. आजारी पडले व त्यामुळे त्यांना ऑटो चालविणे कायमचे बंद करावे लागले. पती, दोन मुले व आपण चौघांचा संसार कसा चालवायचा हा प्रश्न सपनापुढे पडला आणि मग त्यांनी शाळेची नोकरी सांभाळून ऑटो चालविण्याचा निर्णय घेतला. लोक काय म्हणतील, याकडे दुर्लक्ष केले आणि शाळा संपल्यानंतर त्या सडकेवर ऑटो चालवू लागल्या. रात्री उशीरापर्यंत गावातच नव्हे तर चंद्रपूर, राजूरा, कोठारी अशा दूरवरच्या गावांत ऑटो नेतात. गेल्या दोन वर्षांपासून त्या ऑटो चालवीत आहेत. लोकांना नवल वाटते आणि कौतुकही वाटत असल्याचे त्या म्हणाल्या. भीती दूर ठेवली. परिश्रम घेते. प्रवाशी आणि समव्यवसायी पुरुष आॅटोचालक मला मानसिक पाठबळ देतात. हेतू चांगला असला, मनमोकळेपणा असला की, कोणतेही काम साध्य होते. त्यातून आर्थिक पाठबळ मिळते. सकाळी ८ ते १ वाजेपर्यंत शाळा. त्यांनतर ऑटो. तो किती वाजेपर्यंत त्याला वेळ नाही. असा या महिला ऑटो चालकाचा दिनक्रम सुरू आहे.करारी आणि धाडसीसपनाचे अंगी करारीपणा व धाडस आहे. एका प्रवाशाने ऑटोतून उतरल्यानंतर ठरलेले २० रुपये देण्याऐवजी पाचच रुपये देऊ लागला आणि वरुन मुजोरी! सपनाने त्याला खडे बोल सुनावले आणि २० रुपये वसूल केलेच! लोकांना भीवून चालत नाही. कडक व्हावेच लागते, असे वरील अनुभव सांगत त्या म्हणाल्या.