भद्रावती : या वर्षीसुद्धा बैलपोळा तसेच तान्हा पोळ्यावर कोरोनाचे सावट असल्याने अनेक बालकांना घरीच राहून तान्हा पोळ्याचा आनंद साजरा करावा लागला. याच पार्श्वभूमीवर भद्रावती येथील सुरक्षा नगरातील गावंडे परिवारातील बालकांनी तान्हा पोळानिमित्त घरीच राहून नंदीबैलाची आकर्षक सजावट करून डेंग्यू व मलेरियाबाबत जनजागृती केली.
सध्या डेंग्यू, मलेरियाची साथ सुरू आहे. त्यामुळे अनेक लोकांना यामुळे जीवसुद्धा गमवावा लागला आहे. म्हणूनच लोकांमध्ये डेंग्यूविषयी जागृती निर्माण व्हावी व यापुढे कोणावरही हे संकट येऊ नये या हेतूने तान्हा पोळ्याचे औचित्य साधून गावंडे परिवाराने डेंग्यूवर आधारित देखावा निर्माण करून या रोगाविषयी घ्यावयाची काळजी, लक्षणे, उपचार, त्याचप्रमाणे वैयक्तिक व परिसराची स्वच्छता प्रत्येकाने केली पाहिजे, हा संदेश दिला. या
देखाव्यामध्ये उन्नती अमोल गावंडे हिने ''चल चल भाई करे सफाई कुडा कचरा साफ करे'' या वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे भजनातून सर्वांनी स्वच्छता केली पाहिजे, असा संदेश दिला. विधी दीपक आसूटकर या बालिकेने परिसर स्वच्छ केला. हार्दिक विशाल गावंडे या बालकाने राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा स्वच्छतेविषयीचा संदेश दिला. तसेच वेदांती गावंडे हिने ग्रामगीतामधील ओव्याच्या माध्यमातून सर्वांनी रोगमुक्तीसाठी साफसफाई करणे गरजेचे आहे, असे सांगितले.
080921\1447-img-20210908-wa0000.jpg
फोटो