बल्लारपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी झाला असून तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असताना शहरात या दिवसांमध्ये डेंग्यू, मलेरिया नावाचा आजार डासांच्या हल्ल्यामुळे पसरत आहे.
ज्यामुळे छोट्या मुलांसह मोठ्यांना ही या आजाराने ग्रस्त केले असून येथील प्रत्येक दवाखान्यात मोठ्या संख्येने रुग्ण उपचार घेताना दिसत आहे. डेंग्यू व मलेरियाचा प्रसार थांबविण्यासाठी व लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने आशा वर्कर्सच्या माध्यमातून जनजागृती रॅली काढण्यात आली व पत्रके वाटण्यात आले. या रॅलीत मदर टेरेसा शहर स्तरीय संघटन, दीनदयाल अंत्योदय योजना,राष्ट्रीय नागरी निर्वाह अभियान, मदर तेरेसा सिटी लेवल असोसिएशन बल्लारपूर, आशा कार्यकर्ते आणि सामाजिक महिला संघटना यांनी सहभाग घेतला. ही रॅली बल्लारपुरातील प्रत्येक गल्ली वॉर्ड परिसरात काढली आणि नागरिकांना पाणी उघडे ठेवू नये , घरी पाणी साचू देऊ नका, डासांमुळे डेंग्यू, मलेरिया सारखे प्राणघातक आजार होतात, सूचना दिल्याप्रमाणे मच्छरदाणी वापरा असे जनजागृतीचे संदेश देण्यात आले. यात प्रामुख्याने मीनाक्षी गलगट, ज्योती गहलोत, अनिता तेलंग, शशिकला वाळके, नंदा धांडे, मीना घुडे, कुसुम सातपुते, किशोर जांभुळकर आदीसह महिला व पुरुष उपस्थित होते.
130821\screenshot_20210812-110108_samsung internet.jpg
बल्लारपूरात डेंगू मलेरिया रोखण्यासाठी जनजागृती