चंद्रपूर : शहरातील एकमेव अबुल कलाम आझाद बगिचा कात टाकत आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रशासनाने पुढाकार घेऊन या बागेचा कायापालक सुरू केला आहे. महिनाभरापासून बगिचाचे नूतनीकरण सुरू आहे. नूतणीकरणाची निविदा प्रक्रिया वादात अडकल्यापासून हा बगिचा मद्यपींचा अड्डा बनला होता. आता येथे लहान मुले, महिला, पुरूष व वृद्ध आदी सर्व वयोगटातील लोकांसाठी सुविधा उभारण्यात येत आहेत.‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून दि. १९ डिसेंबर रोजी ‘आझाद बगिचा बनला मद्यपींचा अड्डा’ या मथळ्याखाली सर्व गैरप्रकार उघडकीस आणले होते. त्यामुळे मनपाचे प्रशासन खडबडून जागे झाले. या स्टिंग आॅपरेशनंतर प्रशासनाने स्वत: पुढाकार घेऊन अबुल कलाम आझाद बगिचाचे नूनतणीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता खेळ, मनोरंग, आरोग्य आदी विविध शिर्षाखाली मनपाचा मिळणाऱ्या निधीचा उपयोग करण्यात येत आहे. मनपाकडे उपलब्ध निधीतून जेवढे काम करणे शक्य आहे, तेवढ्या सुविधा आझाद बगिचामध्ये उभारण्यात येत आहेत.जिल्ह्यात दारूबंदी असताना आझाद बगिचा मद्यापींसाठी रात्रीला दारूचा अड्डा ठरला होता. त्याचे पुरावे, सकाळी ‘मार्निंग वॉक’ करणाऱ्यांना दिसत होते. बगिच्याच्या झुडपांमध्ये रिकाम्या दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिकचे ग्लास इतस्त: विखुरलेले दिसले होते. सायंकाळनंतर रात्र जसजशी चढत जाते. त्यानुसार शहरातील थंडी वाढत जाते. ही वाढती थंडी पाहून सामान्य नागरिकांची गर्दी कमी होत होती. अशी निर्मनुष्य बाग मद्यपींसाठी पर्वणी ठरत होती. नागरिकांना सायंकाळी व सकाळी फिरण्याकरिता शहराच्या मध्यभागी आझाद बगिचा हक्काचे ठिकाण आहे. तरूण मुले-मुलीदेखील तेथे फिरण्यास येतात. तेथे महिला व पुरूष योग करून आपले आरोग्य निरोगी राखण्याचा प्रयत्न करतात. हा दररोजचा नित्यक्रम आहे. मनपाने बागेची नूतणीकरण सुरू केल्याने आता पुन्हा गर्दी वाढली आहे. आझाद बागेजवळ नाला वाहतो. या नाल्यातील पाण्याचा पुनर्वापर करून झाडांना देण्यात येत आहे. त्यामुळे बागेत हिरवळ फुलली आहे. (प्रतिनिधी)बागेतील ग्रीन जीम नागरिकांसाठी खुलेबागेमध्ये महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांसाठी ग्रीन जीम साकारण्यात आले आहे. या जीमवर व्यायाम करण्यासाठी सकाळ आणि सायंकाळी मोठी गर्दी होत आहे. ही ग्रीन जीम २६ जानेवारीपासून नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. महिला व पुरूषांसाठी वेगवेगळ्या जीम तयार करण्यात आल्या आहेत.वॉकर, लिप्टर आदी लावण्यात आले आहे. नवीन झुले, वाकिंग ट्रॅकची स्वच्छता आदी मनाला आनंद देत आहेत.शहीद स्मारक झाले चकाचकब्रिटिशांविरोधातील स्वातंत्र्य लढ्याचे प्रतिक म्हणून आझाद बगिचामध्ये शहीद स्मारक उभारण्यात आले आहे. पहिल्या स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेले सैनिक आणि चांदा जिल्ह्यातील शहीद बाबुराव पहेलवान बापू राजगोंड यांच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्यात आलेले आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा चबुतरा, कृत्रिम धबधबा आदी याशिवाय महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या परिसराचीही रंगरंगोटी करण्यात आली आहे. नेतांजीच्या पुतळ्यासमोर पाण्याच्या प्रवाहासाठी असलेल्या हौदाचेही नूतनणीकरण करण्यात आले आहे. तेथे रंगीत वॉकरफाल, फिश तुषारही लावण्यात येणार आहे.सायंकाळी अंधारामुळे होते गैरसोयबागेचे नूतणीकरण शहरात एक पर्यटक स्थान निर्माण करण्यात येत आहे. मात्र, बागेच्या काही भागात विद्युत दिवे नसल्याने सायंकाळी अंधार पडल्यावर नागरिकांची गैरसोय होते. अंधार असलेल्या भागात नागरिक टार्च घेऊन जातात. तेथे टॉर्च लावून व्यायाम करतात. अंधारामुळे साप, विंचू आदी प्राणी-किटकांची भीती आहे. देखण्या कचराकुंड्यांचे आकर्षणया बगिचामध्ये आधी कचरा इतस्त: पडलेला असायचा. आता मात्र, नागरिकांनी बागेत घाण करू नये, यासाठी देखण्या कचराकुंड्या लावण्यात आल्या आहेत. रंगीबेरंगी पेंग्विन पक्षाच्या कचराकुंड्या लहान मुलांचे लक्ष वेधून घेतात. बागेत येणारे नागरिकही बाहेर कचरा न फेकता त्या कुंडीमध्ये टाकत आहेत. त्यामुळे बागेचा संपूर्ण परिसर स्वच्छ आणि आकर्षक दिसत आहे. प्रेमी युगुलांची डोकेदुखीमनपाचे आझाद बागेचे नूतणीकरण सुरू केल्यापासून शहरातील नागरिकांची गर्दी वाढली आहे. मॉर्निंग वॉक आणि व्यायाम करणारे मोठ्या संख्येने सकाळी व सायंकाळी येत असतात. बागेचे आकर्षण आता पे्रमी गुगुलांनाही वाटू लागले आहे. आधी युवक-युवतींचे जोडपे केवळ सायंकाळी येत होते. परंतु आता सकाळपासूनच हे जोडपे बागेच्या परिसरात घुटमळत असतात. त्यामुळे महिला, वृद्ध आणि लहान मुलांची डोकेदुखी वाढली आहे. दुपारी बाग बंद ठेवण्यात येत असली तरीही प्रेमी युगूल बागेच्या बाहेर परिसरात दुचाकीवर बसलेले असतात. निविदेच्या वादात न अडकता काम सुरूआझाद बगिचा नव्याने निर्माण करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत आहेत. गेल्या वर्षी तक्रारी झाल्यानंतर निविदा प्रक्रिया थंडबस्त्यात गेली. त्यानंतर पुन्हा यावर्षी सप्टेंबर महिन्यात मनपा स्थायी समितीने निविदा मंजूर केली. परंतु पुन्हा ही निविदा तक्रारीच्या जाळ्यात अडकली आहे. त्या निविदा प्रकियेचा निधी उपयोगात न आणता मनपाने दुसऱ्या उपलब्ध निधीतून हे नूतणीकरण सुरू केले आहे.
आझाद बगिचाचा कायापालट
By admin | Published: February 07, 2017 12:31 AM