शहर काँग्रेसतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
चंद्रपूर : जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना, भक्कम लोकशाही व्यवस्था भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिली आहे. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर ७० वर्षे भारत देश अखंड, सार्वभौम राहिला. लोकशाही दिवसेंदिवस मजबूत झाली. याचे श्रेय बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला आहे. बाबासाहेबांचे विचार आणि त्यांनी दिलेल्या संविधानातच समस्त देशवासीयांना पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे, असे मत खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले.
शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यालय कस्तुरबा चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून वंदन केले. यावेळी शहर अध्यक्ष रामू ऊर्फ रितेश तिवारी, युथ काँग्रेस जिल्हा अध्यक्ष हरीश कोत्तावार, ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रवीण पडवेकर, ओबीसी शहर अध्यक्ष नरेंद्र बोबडे, राजू रंगारी, अख्तर सिद्धीकी, संजय गंपावार, अशपाक हुसेन, मनीष तिवारी, प्रीती शहा, अश्विनी खोब्रागडे, राजू रंगारी यांची उपस्थिती होती.