बाबुराव परसावार सिंदेवाहीसिंदेवाही तालुक्यातील चारगाव (बडगे) खेड्यातील एका गरीब कुटुंबात जन्मलेला मुलगा शेतमजुरीचे काम करता करता एका राईस मिलचा मालक होतो. ही काल्पनिक कथा वाटावी. मात्र ते खरे आहे. एका ध्येयनिष्ठ, जिद्दी, कर्तबगार माणसाने मोठ्या कष्टातून शून् जीवनगाथा आहे. बाबुराव ऋषीजी रामटेके, असे त्यांचे नाव आहे.त्यांच्या घरची परिस्थिती जेमतेम. केवळ एक एकर कोरडवाहू शेतीमध्ये पिकलेल्या थोड्याफार धान्याला आधार म्हणून इतरांच्या शेतात मोलमजुरीची कामे करून अल्पश: मिळकतीवर सहा मुली व एक मुलाचा सांभाळ करण्यासाठी बाबुराव रामटेके यांच्या वडीलांना तारेवरची कसरत करावी लागत असे. त्यामुळे बाबुरावांना चौथ्या वर्गातच शिक्षण सोडून वयाच्या १२ व्या वर्षापासून शेतमजुरीच्या कामावर जावे लागले. शेतमजुरीचे काम करताना काही मजूर नागभीड ते सिंदेवाही नॅरोगेज रेल्वे लाईनचे काम करण्यास गेले. त्या काळात रामटेके यांनी १९६० ते ६५ पर्यंत कुली म्हणून ४० रुपये महिन्याप्रमाणे पाच वर्ष काम केले. रेल्वे लाईनचे काम संपल्यानंतर ते गावीच हरिदास गजभिये (सावकार) यांच्याकडे दरमहा १० कुडव धानावर पाच वर्षापर्यंत शेतमजुरीचे काम केले. या काळात ते इतर कामे करून कुटूंब सांभाळीत होते. त्यानंतर ते नातेवाईकांकडे कामानिमित्त गेले. त्या काळात त्यांचे नातेवाईक समुद्रपूर व हिंगणघाट येथे बैलबंडीने तांदूळ नेवून आठवडी बाजारात त्याची विक्री करीत होते. त्यांच्या संपर्काने रामटेके यांनीही तांदूळ विक्री व धान खरेदी करण्याचा व्यवसाय सुरू केला. येथील सहकारी राईस मिलवर धानाची पिसाई करून बैलबंडीने चार पोते तांदुळ नवरगाव, नेरी, चिमूर मार्गे समुद्रपूरला नेवून विक्री करीत होते. त्या काळात समुद्रपुरला जाण्याकरिता बैलबंडीने दोन दिवस लागायचे. तत्पूर्वी रामटेके हे सायकलीवर पोते घेवून खेडे गावात कुठे आठ पायली तर कुठे पाच पायली धान खरेदी करीत होते. त्यानंतर त्यांनी सिंदेवाही येथे धान खरेदी करून स्वस्तीक राईस मिलवर धानाची पिसाई करून दुसऱ्या व्यापाऱ्यांच्या ट्रकमध्ये दहा पोते तांदुळ व दोन पोते खंडा नागपूरला पाठविणे सुरू केले. या दरम्यान ते चारगाववरुन कधी सायकलीवर तर कधी पायी सिंदेवाहीपर्यंत पाच किलो मीटर येत असत. या व्यवसायात प्रगती केल्यानंतर १९९३ मध्ये त्यांनी चंद्रपूर-नागपूर मार्र्गावर एक एकर जागा खरेदी केली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाकडून दहा लाखांचे कर्ज घेवून १९९६ मध्ये त्यांनी नागराज राईस मिलची उभारणी केली. शेतकऱ्यांकडून धान खरेदी करून स्वत:च्या राईस मिलवर धानाची पिसाई करून विविध जातीचे तांदुळ मुंबई, वाशी, नागपूरला पाठवितात.
शून्यातून विश्व निर्माण करणारे बाबुराव रामटेके
By admin | Published: January 17, 2015 2:06 AM