शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

चिचपल्लीचे बांबू प्रशिक्षण केंद्र रोजगार देणारे बनावे

By admin | Published: March 28, 2017 12:27 AM

चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर जिल्ह्याची ओळख म्हणून संपूर्ण देशात ओळखले गेले पाहिजे.

सुधीर मुनगंटीवार : निवासी इमारतीचा पायाभरणी सोहळा चंद्रपूर : चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर जिल्ह्याची ओळख म्हणून संपूर्ण देशात ओळखले गेले पाहिजे. या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी आपले स्वतंत्र व्यवसाय उभारावे. व्यवसायाभिमूख नव्हे तर हाताला काम देणारा जिल्हा अशी चंद्रपूरची कीर्ती सर्वदूर पोहचवावी, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वने तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.चिचपल्ली येथील बांबू प्रशिक्षण केंद्र व संशोधन केंद्रातील निवासी इमारतीचा पायाभरणी सोहळा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडला. ना सुधीर मुनगंटीवार यांनी ‘जनतेचे शासन’ या उपक्रमांतर्गत या महत्वाच्या केंद्राची पायाभरणी वन विभागाशी संबंधित पाच नागरिकांच्या हस्ते केले. यावेळी व्यासपीठावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बालपांडे, प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा उपवनसंरक्षक आर. टी. धाबेकर, जिल्हा परिषद सदस्य गौतम निमगडे, पं.स. उपसभापती चंद्रकांत धोडरे, चिचपल्लीचे सरपंच श्रीकांत बावने, उपसरपंच सोमा निमगडे आदी उपस्थित होते.मोहा फुलापासून पंचतारांकीत हॉटेलमध्ये विकता येतील, अशा काही वस्तू बनविता येतील का, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी केले. सुरूवातील कुदळ मारून तथा नामफलकाचे अनावरण करून इमारतीची पायाभरणी करण्यात आली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)बांबू प्रशिक्षण केंद्रासाठी २ कोटींचा निधी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असलेला बांबू केवळ विविध वस्तू तयार करून विकण्यासाठी नाही तर या बांबूचा कौशल्यपूर्ण वापर करणारा जिल्हा म्हणून गौरव वाढविण्यासाठी उपयोग झाला पाहिजे. या केंद्राच्या आधुनिकतेसाठी टाटा ट्रस्टसोबत आपण करार केला. ट्रस्टने केंद्राच्या आराखड्यासाठी २ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.