राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमहाराष्ट्र शासनाने प्लास्टिक निर्मूलनासाठी विविध कार्यक्रम राबवून जनजागृती केली. मात्र आडमार्गाने काही दुकानदार प्लास्टिकच्या वस्तूंची विक्री करताना दिसत होते. यासाठी नगरपरिषद प्रशासनाने दुकानांवर धाड टाकून कारवाई करून दंड सुध्दा ठोठावला. मात्र विविध कार्यक्रमात प्लास्टिकच्या वस्तूंची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने मूल नगरपरिषदेने प्लास्टिक निर्मूलनासाठी ‘बर्तन बॅक’ ही नविन कल्पना साकारली आहे. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी व स्वच्छ महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी नगर परिषद मूलने बर्तन बॅक ही अभिनय योजना सुरू केली आहे. या योजनेंअतर्गत घरगुती कार्यक्रम, समारंभ, पूजा, उत्सव, लग्न कार्य आदी कार्यक्रमासाठी स्टीलचे ताट, ग्लास, चमचे, इत्यादी भांडे अत्यंत अल्प दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे. यात एक ताट, दोन वाट्या, एक चमच, एक ग्लास असा एक संच असुन प्रति संच एक रुपया याप्रमाणे रक्कम घेतली जाणार आहे. ही अभिनय योजना सुरू करण्यासाठी नगरपरिषद मूलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व सर्व पदाधिकारी, नगरसेवक यांनी पुढाकार घेऊन सदर योजना प्लास्टिक निर्मूलनासाठी कशी उपयुक्त राहील, यावर आपले मत व्यक्त केले.मूल शहरात प्लास्टिक निर्मूलनासाठी बर्तन बॅक ही अभिनव योजना उपयुक्त राहील, असा आशावाद उपस्थितांनी व्यक्त केल्यानंतर ही योजना अमलात आणण्यासाठी योजनेला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्यामुळे ही बर्तन योजना अमलात आली आहे. दिवसेंदिवस प्लास्टिकचा होत असलेला वापर कमी होण्याऐवजी वाढतच आहे. यावर उपाय म्हणजे शहरवासीयांना प्रत्यक्षरित्या स्टीलच्या भांडयाचा वापर करणे हाच एकमेव पर्याय असल्याचेही लक्षात आले. त्यामुळे ही योजना सुरू करण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे. या उपक्रमांमुळे मूल शहरातील नागरिकांना अल्प किंमतीत भांडे उपलब्ध होणार असल्याने प्लास्टिकचा वापर आपोआपच कमी होऊन नागरिकांचा बर्तन बॅककडे कल वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला व्यापक स्वरूप यावे, प्लास्टिक निर्मूलनासाठी एक व्यापक व कायमस्वरुपी योजना अमलात आणण्यासाठी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर व पदाधिकारी, नगरसेवक यांच्या सहकार्याने बर्तन बॅक ही अभिनव योजना अमलात आणली. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळेल व प्लास्टिकचे निर्मूलन आपोआपच होईल, असा विश्वास वाटतो.- विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी न. प. मूल.
प्लास्टिक निर्मूलनासाठी तयार झाले बर्तन बॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 6:00 AM
प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी व स्वच्छ महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी नगर परिषद मूलने बर्तन बॅक ही अभिनय योजना सुरू केली आहे. या योजनेंअतर्गत घरगुती कार्यक्रम, समारंभ, पूजा, उत्सव, लग्न कार्य आदी कार्यक्रमासाठी स्टीलचे ताट, ग्लास, चमचे, इत्यादी भांडे अत्यंत अल्प दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे. यात एक ताट, दोन वाट्या, एक चमच, एक ग्लास असा एक संच असुन प्रति संच एक रुपया याप्रमाणे रक्कम घेतली जाणार आहे.
ठळक मुद्देमूल नगरपरिषदेचा अभिनव उपक्रम : इतर नगरपालिकेसाठी प्रेरणादायी