क्रीडा कौशल्याला वाव देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या स्पर्धेत सिनिअर गटात ९ तर ज्युनिअर गटा सहा संघ सहभागी झाले होते. सिनिअर गटात ॲड. प्रशांत अटाळकर व अर्णव हिंगाने यांनी विजेतेपद पटकाविले तर किरण धुमने व किरण बरडे उपविजेते ठरले. ज्युनिअर गटात मृण्मयी संजय गोरे व नकुल प्रशांत अटाळकर यांनी विजेते तर अर्णव ठोंबरे व अंशुल गेडाम हे उपविजेते ठरले. बक्षीस वितरण कार्यक्रमाला नगराध्यक्ष अरुण भाऊ धोटे, प्रा. डॉ. संजय गोरे, किशोर हिंगाने, क्रीडा प्रशिक्षक बाळू चिंचोळकर, प्रमोद कोंडलकर यांच्या उपस्थितीत ट्रॉफी प्रदान करण्यात आली. यशस्वीतेसाठी ॲड. प्रशांत अटाळकर, किरण बरडे, किरण ढुमने, सतीश कुचनवार, प्रमोद कोंडलकर, प्रणव कोंडलकर, निशांत बरडे, संचेत कुचणवार, सुशांत बोरकुटे, आर्यन हिंगाने, चेतन कुचणवार, ओम बरडे, आदित्य चिंचोळकर, आर्यन हिंगाने आदींनी प्रयत्न केले. संचालन डॉ. संजय गोरे तर आभार किरण ढुमने यांनी मानले.
राजुरा येथे बॅटमिंटन प्रिमीयर लिग स्पर्धेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 4:25 AM