आनंद भेंडे ।आॅनलाईन लोकमतराजुरा : राज्याच्या शेवटच्या टोकावरील बगलवाडी या अतिदुर्गम व जंगलाच्या सानिध्यात वसलेले गाव. येथील आदिवासी कोलाम बांधवांना अजूनही नरकयातना सहन कराव्या लागत आहे. डबक्यातील पाणी पिऊन जीवन जगावे लागत आहे. वारंवार ओरड करूनही त्यांच्याकडे कुणाचेही लक्ष नाही. कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ नाही. त्यामुळे बगलवाडीतील नागरिक उपेक्षितांचे जिणे जगत आहेत.बगलवाडी येथे आदिम कोलामाची ३० घरांची वस्ती आहे. तेथील लोकसंख्या १०० च्या वर आहे. कोलाम ही जमात गावापासून दूर राहते. हे बांधव वनजमिनीवर अतिक्रमण करून शेती करीत आहे. हेच त्यांचे जीवन जगण्याचे साधन आहे. अशिक्षिततेमुळे त्यांच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कोणीच वाली नसल्याचे दिसत असल्याने नाईलाजाने ते वर्षानुवर्षांपासून खडतर आयुष्य जगत आहेत. प्रस्तुत प्रतिनिधीने बागलवाडीला भेट दिली असता त्यांची केविलवाणी स्थिती दिसून आली. कुठल्याही सोई-सवलती त्यांच्यापर्यंत पोहचल्या नसल्याचे दिसून आले. सुमारे १० वर्षांपासून पाण्याची सोय नसल्यामुळे गावाजवळील नाल्याच्या बाजुला खड्डा खोदून त्यातील पाणी ते पित आहेत.वनविभागाच्या जमिनीवर कोलाम बांधवांनी अतिक्रमण केले आहे. त्यांनी वनविभागाकडून ना हरकत पत्र मिळविलेले नाही. त्यामुळे त्यांना सोयी, सवलती उपलब्ध करून देण्यास अडचण निर्माण झाली आहे.- ओमप्रकाश रामावतसंवर्ग विकास अधिकारी, पं.स. राजुरा
बगलवाडीचे कोलाम जगतात उपेक्षितांचे जिणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:51 PM
राज्याच्या शेवटच्या टोकावरील बगलवाडी या अतिदुर्गम व जंगलाच्या सानिध्यात वसलेले गाव. येथील आदिवासी कोलाम बांधवांना अजूनही नरकयातना सहन कराव्या लागत आहे. डबक्यातील पाणी पिऊन जीवन जगावे लागत आहे.
ठळक मुद्देनरकयातना : योजनांचा लाभ नाही