साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : विद्यार्थ्यांना शाळांमधून केवळ पाठ्यपुस्तकांचे ज्ञान न मिळता त्यांना शैक्षणिक, सामाजिक, मूल्यवर्धन तसेच सर्वांगीण विकास व्हावा, शाळेमध्ये येण्याची आवड निर्माण होऊन यातून त्यांच्या ज्ञानात भर पडावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आदिवासी उपाययोजना नावीण्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आठ आश्रमशाळा तसेच २८ जिल्हा परिषद शाळांची बाला पेंटिंगसाठी निवड करण्यात आली आहे. या अंतर्गत या शाळांना ९९ लाख तीन हजार रुपयांचा निधी मिळाला असून, शाळांचे लवकरच रूपडे बदलणार आहे.
विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांतून ज्ञान मिळत असले तरी शाळेच्या बाहेरील परिसर, आजूबाजूचे वातारण यातूनही बरेच काही शिकता येते. शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांचे मनोरंजन होऊन त्याचे मन रमावे यातून त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी, आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी बाला पेंटिंग अंतर्गत शाळांतील प्रत्येक भागाची पेंटिंग करण्यात येणार आहे. यासाठी शाळांच्या इमारतींचा प्रत्येक भागांचा उपयोग विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढविण्यासाठी करण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजना सन २०२०-२१ अंतर्गत नावीण्यपूर्ण योजना अंतर्गत आठ शासकीय आश्रमशाळा आणि २८ जिल्हा परिषद शाळांना यासाठी ९९ लाख तीन हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या कामाला सुरुवात होणार असून, विद्यार्थ्यांसाठी या शाळा लवकर तयार होणार आहे.
बाॅक्स
वर्षभरापासून नाते तुटले
कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून विद्यार्थी आणि शाळेचे नाते तुटले. अशावेळी शाळेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होईल, अशा पद्धतीने आकर्षक पेंटिंग काढून शाळांना सजविण्यात येणार आहे.
बाॅक्स
असा मिळणार निधी
आठ शासकीय आश्रमशाळांना ७६ लाख ६३ हजार रुपये, तर जिल्हा परिषदेच्या २८ शाळांना २२ लाख ४० हजार असे एकूण ९९ लाख नऊ हजार रुपयांचा निधी शाळांना वितरित करण्यात आला आहे.
बाॅक्स
या आश्रमशाळांचा समावेश
शासकीय आश्रमशाळा, बोर्डा, शासकीय आश्रमशाळा, देवाडा, शासकीय आश्रमशाळा, जिवती, शासकीय आश्रमशाळा, मरेगाव, शासकीय आश्रमशाळा, पाटण, शासकीय आश्रमशाळा, रूपापेठ, शासकीय आश्रमशाळा, मंगी, शासकीय आश्रम शाळा, देवई.
बाॅक्स
जिल्हा परिषद शाळा, राजुरा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मंगी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, टेंबुरवाही, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, देवाडा, कोरपना जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोरना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रूपापेठ, जिल्हा परिषद उ. प्राथमिक शाळा, नांदा मराठी,
जिवती जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कुंभेझरी, जिल्हा परिषद प्रथमिक शाळा, शेनगाव, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, टेकामांडवा, बल्लारपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इटोली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोर्टी मुक्ता, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कवडजई
चंद्रपूर जिल्हा परिषद उ. प्राथमिक शाळा, अजयपूर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लोहारे, गोंडपिपरी, उच्च प्राथमिक शाळा, करंजी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, बोरगाव, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, धानापूर, पोंभुर्णा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोंगरहळदी, तु., जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आष्टा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चिंतधाबा, मूल, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, भवराळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काटवन, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, नल्लेश्वर, सावली, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, खेडा जि.प. उच्च प्राथमिक शाळा, सादागड, सिंदेवाही, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सरडपार, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कच्चेपार, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पेटगाव.
कोट
बाला पेंटिंगसाठी जिल्ह्यातील आठ आश्रमशाळा आणि आदिवासी भागातील २८ जिल्हा परिषद शाळांची निवड करण्यात आली आहे. यातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल, अशा पद्धतीने पेंटिंग करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजना अंतर्गत नावीण्यपूर्ण योजनेअंतर्गत निधी वितरण करण्यात आला.
-राहुल कर्डिले
सीईओ, चंद्रपूर
कोट
बोर्ड तसेच पुस्तक याव्यतिरिक्त शाळेच्या परिसरातूनही विद्यार्थ्यांच्या ज्ञानात सर्वांगीण भर पडावी यासाठी शाळांतील इमारतीसह प्रत्येक परिसराची आकर्षक पेंटिंग करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागून त्यांना शाळांमध्ये आनंददायी शिक्षण मिळणार आहे.
-रोहन घुगे
सहाय्यक जिल्हाधिकारी, चंद्रपूर