लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कुटुंबातील महिलांना स्वयंपाक करताना स्वच्छ व चांगले इंधन मिळावे आणि सर्वांना गॅस कनेक्शन मिळावे, जंगल तोडीवर आळा बसावा, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजना देशामध्ये सुरू केली आहे. हा प्रकल्प पथदर्शी म्हणून सुरुवातीला बल्लारपूर मतदार क्षेत्रात व त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याचा संकल्प करण्यात आला. हा संकल्प पूर्णत्वास गेला असून बल्लारपूर मतदार क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर बहुतेक कुटुंबाला गॅस वितरण पूर्ण झाले आहे.हळूहळू याच धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावात गॅस कनेक्शन देण्यात आले. लवकरच जिल्ह्यातील सर्व कुटुंबातील महिलांना गॅस कनेक्शन मिळावे, याचे नियोजन केले जात आहे. कोणत्याही कुटुंबातील महिलांना चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी जळाऊ लाकडांचा उपयोग करावा लागू नये, सर्व गावे, शहरे धूरमुक्त व्हावे, हा या योजनेमागील उद्देश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील कुटुंबांना १०० टक्के गॅस कनेक्शन मिळावे यासाठी १०० टक्के गॅस जोडणीचा हा उपक्रम राबविला आहे.प्रायोगिक तत्त्वावर बल्लारपूर क्षेत्रात बहुतेक कुटुंबाला गॅस वितरण करण्यात आले आहे. या उपक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे बल्लारपूर क्षेत्रातील सर्व कुटुंबातील महिलांना स्वच्छ व चांगले इंधन मिळावे हा आहे.या उपक्रमांतर्गत गॅस वितरण उज्वला योजना, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना (संयुक्त वनव्यवस्थापन समिती, वनविभाग) सामाजिक उत्तरदायित्व निधीतून गॅस वाटप केलेले आहे.अजयपूर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्रचंद्रपूर तालुक्यातील अजयपूर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला पीएनबी फार्मर्स वेलफेअर ट्रस्टतर्फे २७ सप्टेंबर २०१८ रोजी मान्यता देण्यात आली आहे. अजयपूर येथे सर्व आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या केंद्रासाठी अजयपूर येथील ८ ते १० एकर जमा उपलब्ध करून देण्याबाबत पी.एन.बी.फार्मर्स वेलफेअर ट्रस्टने केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने राज्य मंत्रीमंडळाने ६ एप्रिल २०१७ रोजी मान्यता दिली आहे. अजयपूर शासकीय जमीन या प्रशिक्षण केंद्रासाठी मंजूर करण्यात आली आहे. राज्यमंत्री मंडळाच्या निर्णयानंतर पीएनबी फार्मर्स वेलफेअर ट्रस्टकडे सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला ट्रस्टने मान्यता दिल्यामुळे या संस्थेचे भारतातील अशा पद्धतीचे अकरावे शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. शेती, शेतकरी, कृषी संस्कृती व अर्थार्जन या सर्वच विषयाला विभागाचा आर्थिक उत्कर्ष लक्षात घेवून या ठिकाणावरुन हातभार लागणार आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यास याची मदत होणार आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजना देशामध्ये सुरू केली तेव्हा हा प्रकल्प पथदर्शी म्हणून बल्लारपूर मतदार संघात राबविण्याची आपली इच्छा होती. आज हा मतदार संघ चूलमुक्त झाला आहे, याचा आनंद आहे. यासोबतच आपण पंजाब नॅशनल बँकेच्या उच्चाधिकाऱ्यांशी चर्चा करून चंद्रपूर जिल्ह्यात अजयपूर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देत पी.एन.बी. फार्मर्स वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून अजयपूर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.- सुधीर मुनगंटीवार, अर्थ, नियोजन व वनेमंत्री,महाराष्ट्र शासन.नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजना सुरू केलीे. ही योजना पाकलमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वप्रथम बल्लारपूर मतदार संघात राबविली. सर्व कुटुंबांना गॅस कनेक्शन दिले. आता लाकडे आणायला जंगलात जावे लागत नाही. त्यामुळे महिला व पुरुषांचा बराच वेळ वाचतो. याशिवाय वन्यप्राणी हल्ल्याची भीतीही राहिलेली नाही.-विद्या देवाळकर, विसापूर.आता घरोघरी शासनाकडून गॅस कनेक्शन मिळाले आहे. यामुळे महिला वर्ग आनंदी आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांचे आभार मानावेच लागेल. महिला धूरमुक्त झाल्यामुळे त्यांच्या आरोग्यही आता चांगले राहणार आहे.-किरण दुधे, बल्लारपूर
बल्लारपूर मतदार संघाने चुलमुक्त अभियानात घेतली आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 6:00 AM
प्रायोगिक तत्त्वावर बल्लारपूर क्षेत्रात बहुतेक कुटुंबाला गॅस वितरण करण्यात आले आहे. या उपक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे बल्लारपूर क्षेत्रातील सर्व कुटुंबातील महिलांना स्वच्छ व चांगले इंधन मिळावे हा आहे.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : जंगलतोडीवरही आळा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना