लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यात ४५ लाख कुटुंबाकडे गॅस जोडणी नाही. त्यांनी गणेशोत्सवापूर्वी गॅस जोडणी देऊन अवघा महाराष्ट्र चुलमुक्त करणार असल्याची माहिती सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत देतानाच बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील शिधापत्रिका गॅस जोडणीचा आढावाही यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी यांनी घेतला.यावेळी अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांच्यासह सर्व संबधित उपस्थित होते. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात गॅस नसलेल्या शिधापत्रिकांची संख्या ११ हजार ८३ इतकी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या शिधापत्रिका धारकांना गॅस जोडणी देऊन पूर्ण विधानसभा क्षेत्र गॅसयुक्त करण्यासाठी त्यांचे रेशनकार्ड, बँक खाते आणि बँक खात्याची आधार कार्डशी जोडणी अशी तीन कामे प्राधान्याने हाती घ्यावीत. गॅस जोडणीयुक्त तालुक्याचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी फिरते वाहन तयार करावे जे दिलेल्या तारखेस निश्चितवेळी निश्चित ठिकाणी जाऊन फॉर्म संकलित करील. या वाहनात प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत जेणेकरून गॅस जोडणीसाठी सादर केलेला अर्ज अचूकपणे भरला की नाही हे पाहिले जाईल, विधानसभा क्षेत्रात अर्ज स्वीकारण्यासाठी समन्वयक नेमण्यात यावेत, अशा सूचना ही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी केल्या.या विधानसभा क्षेत्रात बल्लारपूर येथे२८०७, मूल मध्ये ६३४६, पोंभूर्णा, ११९६, चंद्रपूर ग्रामीण ७३४ अशी एकूण ११०८३ गॅस नसलेल्या शिधापत्रिकांधारकांची संख्या आहे. त्यांना येत्या काही दिवसात गॅस जोडण्या देण्याबाबतच्या कार्यवाहीला वेग देण्याच्या सूचना ही यावेळी ना. मुनगंटीवार यांनी केल्या.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्र लवकरच चूलमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 10:33 PM
राज्यात ४५ लाख कुटुंबाकडे गॅस जोडणी नाही. त्यांनी गणेशोत्सवापूर्वी गॅस जोडणी देऊन अवघा महाराष्ट्र चुलमुक्त करणार असल्याची माहिती सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत देतानाच बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील शिधापत्रिका गॅस जोडणीचा आढावाही यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी यांनी घेतला.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : मुंबईच्या आढावा बैठकीत दिले निर्देश