काहीही मापदंड न ठरविता गृहकरात ३४० रुपये तर व्यावसायिकांवर ५४० एवढी वाढ कराच्या मागणीतून करण्यात आली आहे. हे अन्यायकारक आहे. तद्वतच, शहरातील घनकचरा व्यवस्थापनाकरिता करण्यात आलेली निविदा ठेकेदारांच्या हितार्थ आणि नगर पालिकेचे उत्पन्न बुडविणारी आहे. याकरिता नवीन निविदा करण्यात यावी, जेणेकरून नगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल. अशा दोन मागण्या निवेदनात आहेत. हे निवेदन मुख्याधिकारी विजय सरनाईक यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी बल्लारपूर महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष ॲड. मेघा भाले, तालुका अध्यक्ष अफसाना सैय्यद, नगरसेविका मीना बहुरिया, सुजाता गणवीर, ममता चंदेल, प्रकृती पाटील, छाया शेंडे, परिणीता गायगोले, बेबी केसकर, अनिता तेलंग इत्यादींची उपस्थिती होती.
वाढीव कर रद्द करण्याची बल्लारपूर महिला काँग्रेसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 4:31 AM