लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : येथील रेल्वे स्थानकावरुन सकाळी ५.३० वाजता सुटणारी बल्लारशाह-गोंदिया पॅसेंजर रेल्वे डोंगरगडपर्यंत न्यावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय रेल्वे प्रबंधक शोभना बंडोपाध्याय यांच्याकडे निवेदनातून केली आहे़दक्षिण, पूर्व, मध्यरेल्वे मार्गावर डोंगरगढ येथे भाविकांचे श्रद्धास्थान माता बंबलेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. याठिकाणी लाखो भाविक मातेच्या दर्शनाला जातात. याशिवाय तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू व नागपूर, मुंबई, भोपाळ, दिल्ली येथे जाण्यासाठी प्रवाशांना र्रेल्वेगाड्यांची गरज आहे़ वडसा ते चांदाफोर्टपर्यंत येणाऱ्या गाडीला बल्लारशाह रेल्वेस्थानकापर्यंत थांबा द्यावे, अशी मागणी रेल्वे संघाने केली़ बल्लारशाह-गोंदिया मार्गावरुन धावरी गाडी क्रमांक १२८५२ चेन्नई-बिलासपूर व्हाया चांदाफोर्ट, गाडी क्रमांक १२२५१ वैनगंगा यशवंतपूर-कोरबा व्हाया चांदाफोर्ट, त्रिरोवल्ली-बिलासपूर, एर्नाकुलम-बिलासपूर, त्रिवेंद्रम-कोरबा आदी गाड्यांपैकी एका सुपरफॉस्ट गाडीला हावडापर्यंत विस्तार करावा़ त्यामुळे गडचिरोली, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांना चांगली सुविधा निर्माण होवू शकते. व्यापार वाढीला चालना मिळेल़ त्याचप्रमाणे चैनई-बिलासपूर, वैनगंगा यशवंतपूर-कोरबा गाडीला मूल येथील रेल्वे स्थानकावर थांबा द्या़ अशी आग्रही मागणी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय प्रबंधक शोभना बंडोपाध्याय यांचेकडे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार यांनी केली. ग्रामीण भागातील जनतेला रेल्वेचा प्रवास सुविधाजनक आहे. मागील काही वर्षांपासून डोंगरगड या धार्मिक स्थळावर भाविकांची गर्दी वाढत आहे़ बंबलेश्वरीच्या दर्शनासाठी जायचे असेल तर बल्लारशाह-गोंदिया पॅसेंजरचा उपयोग होत नाही़ मध्येच उतरून बस अथवा अन्य साधनांनी पुढचा प्रवास करावा लागतो़ ही गाडी शेवटच्या स्थानापर्यंत नेल्यास भाविकांची मोठी सोय होईल़ शिवाय दक्षिणेतील विविध राज्यांतील भाविकांचा प्रवास सुकर होवू शकेल़ त्यामुळे बल्लारशहा- गोंदिया पॅसेंजर डोंगरगडपर्यंत न्यावे, अशी मागणी दक्षिणपूर्व मध्य रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे़
बल्लारशाह पॅसेंजर डोंगरगडपर्यंत न्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 11:03 PM
येथील रेल्वे स्थानकावरुन सकाळी ५.३० वाजता सुटणारी बल्लारशाह-गोंदिया पॅसेंजर रेल्वे डोंगरगडपर्यंत न्यावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय रेल्वे प्रबंधक शोभना बंडोपाध्याय यांच्याकडे निवेदनातून केली आहे़
ठळक मुद्देजिल्हा रेल्वे प्रवासी संघाची मागणी : विभागीय रेल्वे प्रबंधकांना निवेदन